शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना पत्ता विचारल्याने युवकांना बेदम मारले; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस लागले तपासाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:23 IST

Mob Lynching : मुले विनवणी करीत राहिले पण लोकांनी त्यांचे ऐकले नाही. मारहाण इतकी केली की दोघांचेही कपडे फाटले.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी दोन्ही तरुणांना खांबाला बांधले आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर गावकऱ्यांनी पट्टयाने मारहाण केली.

पालीगंज - राजधानी पटनातील मनेर भागात दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रस्त्यात दोन तरुणांनी कोचिंगला क्लास जाणाऱ्या दोन मुलींचा पत्ता विचारल्याचा आरोप आहे. त्यानंतर या मुलांच्या अडचणीत वाढ झाली आणि दोघांना दोरीने खांबाला बांधून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. मुले विनवणी करीत राहिले पण लोकांनी त्यांचे ऐकले नाही. मारहाण इतकी केली की दोघांचेही कपडे फाटले.ग्रामस्थांनी खांबाला बांधून मारहाण केलीगावकऱ्यांनी दोन्ही तरुणांना खांबाला बांधले आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर गावकऱ्यांनी पट्टयाने मारहाण केली. यामुळे त्यांच्या दोन्ही शरीरावर बर्‍याच ठिकाणी दुखापतींचा जखमा दिसू लागली. इतकेच नाही तर एकाने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ १० दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे.

तरुणांवर काय आरोप आहेतमिळालेल्या माहितीनुसार,  मनेर पोलिस स्टेशनच्या महवा गावातील दोन मुली कोचिंगसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर वाटेत दोन तरुणांनी त्याच्यावर काही भाष्य केले आणि त्याच्या घराचा पत्ता विचारण्यास सुरुवात केली. मुलींनी आरडाओरडा केला, यामुळे गावातील लोक जमा झाले. त्यांनी दोन्ही आरोपी तरुणांना पकडले आणि नंतर त्यांना जबर मारहाण केली. त्याचवेळी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.पोलिस स्टेशन म्हणाले - आरोपींविरोधात कारवाई केली जाईलपोलिस स्टेशनचे मनेर आलोक कुमार यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओबद्दल माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. व्हिडीओतील सत्यता पडताळली जात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तरुणांनी मुलींचा विनयभंग केला असता, त्यांनी पोलिस ठाण्यात ही माहिती दिली पाहिजे होती, परंतु तसे न करत लोकांनी कायदा हातात घेतला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसLynchingलीचिंगSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल