सुट्टी मागितली अन् मॅनेजर ओरडला; संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने बँकेतच झाडली गोळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:24 IST2026-03-17T09:23:00+5:302026-03-17T09:24:46+5:30

बलराम नगर येथील 'पंजाब अँड सिंध बँके'त एका सुरक्षा रक्षकाने किरकोळ वादातून आपल्याच ब्रँच मॅनेजरची गोळी झाडून हत्या केली.

Asked for leave and manager yelled; Angry security guard shoots in bank! | सुट्टी मागितली अन् मॅनेजर ओरडला; संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने बँकेतच झाडली गोळी!

सुट्टी मागितली अन् मॅनेजर ओरडला; संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने बँकेतच झाडली गोळी!

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील लोनी परिसरात सोमवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. बलराम नगर येथील 'पंजाब अँड सिंध बँके'त एका सुरक्षा रक्षकाने किरकोळ वादातून आपल्याच ब्रँच मॅनेजरची गोळी झाडून हत्या केली. सुट्टी आणि पगाराच्या कारणावरून झालेल्या वादाचा शेवट थेट हत्येत झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. अभिषेक शर्मा (वय ३४) असे मृत मॅनेजरचे नाव आहे.

भरदिवसा बँकेत रक्ताचा सडा

सोमवारी दुपारी १:०० च्या सुमारास बँक नेहमीप्रमाणे ग्राहकांनी गजबजलेली होती. सुमारे ५० ते ६० ग्राहक बँकेत आपले व्यवहार करत होते. इतक्यात, सुरक्षा रक्षक रविंद्र हुड्डा आपल्या एका साथीदारासह बँकेत दाखल झाला. त्याने थेट मॅनेजर अभिषेक शर्मा यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. सुट्टी आणि पगारावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात रविंद्रने आपली परवानाधारक बंदूक उचलली आणि थेट अभिषेक यांच्या छातीत गोळी झाडली. गोळीबाराच्या आवाजाने बँकेत एकच गोंधळ उडाला.

नेमकं वादाचं कारण काय?

आरोपी रविंद्र हुड्डा हा भारतीय लष्करातून २०१८ मध्ये निवृत्त झाला होता. तो दारूच्या आहारी गेल्याचे आणि कामावर वारंवार विनापरवाना गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी तो सकाळी ड्युटीवर आला नव्हता, ज्यावरून मॅनेजर अभिषेक यांनी त्याला फोन करून समज दिली होती. दुपारी जेव्हा तो बँकेत आला, तेव्हा सुट्टी आणि जुन्या तक्रारींवरून वाद विकोपाला गेला आणि रविंद्रने हे टोकाचे पाऊल उचलले.

मॅनेजरच्या घरात नुकताच पाळणा हलला होता.. 

मृत अभिषेक शर्मा हे मूळचे बिहारच्या पाटणा येथील रहिवासी होते. ऑगस्ट २०२५ पासून ते या शाखेत कार्यरत होते. अत्यंत संघर्षातून त्यांनी हे पद मिळवले होते आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली होती. नुकताच नवस पूर्ण करून ते गावाहून परतले होते. त्यांच्या निधनाने एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आरोपी अटकेत

हत्येच्या घटनेनंतर आरोपी रविंद्र आपल्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाला होता. मात्र, गाझियाबाद पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांतच मुख्य आरोपी रविंद्र हुड्डा आणि त्याचा साथीदार शीशपाल याला अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेले शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे.

Web Title : छुट्टी न मिलने पर गार्ड ने बैंक मैनेजर को गोली मारी

Web Summary : गाजियाबाद में छुट्टी और वेतन विवाद के बाद एक सुरक्षा गार्ड ने बैंक मैनेजर की गोली मारकर हत्या कर दी। सेना के पूर्व सैनिक गार्ड की पहले भी अनुपस्थिति का इतिहास रहा है। हाल ही में एक बेटी के पिता बने मैनेजर के परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा। शूटर और साथी गिरफ्तार।

Web Title : Guard Shoots Manager Dead After Leave Dispute at Bank

Web Summary : In Ghaziabad, a security guard fatally shot his bank manager following an argument over leave and salary. The guard, an army veteran, had a history of absenteeism. The manager, recently blessed with a daughter, leaves behind a grieving family. The shooter and accomplice were arrested.