१७ वर्षाच्या आशुतोषचे एका मुलीवर प्रेम होते. गेल्या ८ महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. पण, अचानक गर्लफ्रेंडचं वागणं बदललं. आशुतोषला संशय आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. व्हॅलेंटाईन आठवडा सुरू झाला, तेव्हा आशुतोषने तिला गिफ्ट पाठवत पुन्हा मनवण्याचा प्रयत्न केला. पण, वाद वाढत गेला. त्यानंतर आशुतोषने व्हॅलेंटाईनच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात ही घटना घडली. जॉर्ज टाऊन पोलीस ठाणे हद्दीतील टागोर टाऊनमध्ये गर्लफ्रेंडसोबत बिनसल्यानंतर आशुतोष प्रताप गिरी उर्फ अमनने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. आशुतोषचा मृतदेह घरात लटकलेला होता. तिथेच त्याच्या गर्लफ्रेंडने दिलेली चिठ्ठी सापडली.
"माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण..."
पोलिसांना आशुतोषच्या मृतदेह असलेल्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. ती त्याच्या गर्लफ्रेंडने दिलेली आहे. सुहानी सिंग असे या मुलीचे नाव आहे. या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की, प्रिय आशु, माझं तुझ्यावर खूप प्रे आहे. पण, आता मला तुझ्यासोबत राहायची इच्छा नाहीये. मला माफ कर. तू मरून जा. मला काहीही देणं-घेणं नाहीये. तुझे प्रेम सुहानी सिंग."
एनडीएची तयारी करत होता आशुतोष
१७ वर्षीय मयत आशुतोषचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते आणि तो एनडीएची तयारीही करत होता. त्याला एक भाऊ आणि एक छोटी बहीण आहे. आशुतोष हॉकीही खेळाडूही होता. त्याचे वडील होमगार्ड आहेत. तर काका उत्तर प्रदेश पोलीस विभागात कार्यरत आहेत.
मयत आशुतोषची बहीण निधीने सांगितले की, आशुतोषच्या कोचिंग क्लासमध्ये शिकत होता, तिथेच प्रतापगढची ही तरुणीही होती. त्यांचे आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते.
आशुतोषच्या घराजवळ एक मुलीचे वस्तिगृह आहे. ती मुलगीही एनडीएची तयारी करत आहे. मुलीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. त्यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. एका आठवड्यापूर्वी मुलीने तिच्या चार-पाच मित्रांसह आशुतोषला मारहाण केली. त्याचा मोबाइलही हिसकावून घेतला होता. याची तक्रारही पोलीस ठाण्यात केली होती.
आशुतोषने व्हॅलेंटाईन आठवडा सुरू झाल्यानंतर तिला दररोज भेटवस्तू दिल्या. दोघांमध्ये शुक्रवारी रात्री मोबाईलवरून वाद झाला. त्यावेळी ती आशुतोषला बोलली की तू मेला तरी मला फरक पडत नाही.
Web Summary : Upset after his girlfriend's harsh note telling him to die, 17-year-old Ashutosh committed suicide in Prayagraj. The note revealed she no longer wanted to be with him. He was also preparing for NDA exams.
Web Summary : प्रयागराज में 17 वर्षीय आशुतोष ने गर्लफ्रेंड के कठोर नोट से परेशान होकर आत्महत्या कर ली। नोट में लिखा था कि वह अब उसके साथ नहीं रहना चाहती। आशुतोष एनडीए परीक्षा की तैयारी भी कर रहा था।