Aryan Khan Drug Case: आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा वाढवली, स्पेशल बॅरेकमध्ये हलवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 07:12 PM2021-10-18T19:12:58+5:302021-10-18T19:13:29+5:30

Aryan Khan Drug Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात आहे.

Aryan Khan security increased in arthur road jail and shifted him to special barrack | Aryan Khan Drug Case: आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा वाढवली, स्पेशल बॅरेकमध्ये हलवलं

Aryan Khan Drug Case: आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा वाढवली, स्पेशल बॅरेकमध्ये हलवलं

Next

Aryan Khan Drug Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात आहे. कोर्टानं आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. एनसीबीची (Narcotics Control Bureau-NCB) कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा आता वाढवली आहे. आर्यनला स्वतंत्र आणि स्पेशल बॅरेकमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक पातळीवर आर्यन खानवर लक्ष ठेवलं जात आहे. 

ड्रग्ज प्रकरणाशी निगडीत इतर आरोपींशी आर्यन खान तुरुंगात अजिबात बोलत नाही. तुरुंगातील परिस्थीती आणि जेवण देखील आर्यन खानला जात नसल्याचं समोर आलं आहे. तुरुंगातील जेवण आर्यन खान खात नसल्यानं त्याच्या प्रकृतीबाबतही चिंता आता तुरुंग प्रशासनाला लागून राहिली आहे. 

शाहरुखनं आर्यनला पाठवली ४५०० रुपयांची मनी ऑर्डर
तुरुंगाचे अधिक्षक नितीन वायचाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान याला ११ ऑक्टोबर रोजी साडेचार हजार रुपयांची मनी ऑर्डर त्याचे वडील शाहरुख खान यांनी पाठवली आहे. या पैशांचा खर्च आर्यन खान याला तुरुंगातील कॅन्टीनमधील जेवणावर करु शकतो. पण तुरुंगात आर्यन पोटभर जेवण करत नसल्याचं सांगण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार प्रत्येक कैद्याला दरमहा फक्त साडेचार हजार रुपये मनी ऑर्डरच्या स्वरुपात मागविण्याची परवानगी आहे.  

चांगला व्यक्ती बनून दाखवेन, आर्यननं दिलं वचन
एनसीबीचे झोनल अधिकारी समीन वानखेडे यांना आर्यन खाननं तुरुंगाबाहेर आल्यानंतर चांगला व्यक्ती बनून दाखवेन आणि तुम्हाला माझा एक दिवशी अभिमान वाटेल असं काम करेन, असं वचन दिल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्स सेवन प्रकरणी एनसीबीकडून आर्यन खानचं समुपदेशन करण्यात आलं. त्यावेळी आर्यन खाननं आपल्या चुकीची माफी मागत यापुढे अशाप्रकारचं काम आपल्या हातून होणार नाही, असं वचन दिलं आहे. याशिवाय आर्थिक दुर्बल घटकाला मदत करण्याचंही वचन आर्यननं समीर वानखेडे यांना दिलं आहे. समीर वानखेडे आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आर्यन खान याचं समुपदेशन करण्यात आलं. त्यावेळी आर्यननं वानखेडे यांना वचन दिलं आहे.

Web Title: Aryan Khan security increased in arthur road jail and shifted him to special barrack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app