Aryan Khan Drugs Case: 16 दिवसांत चार जामिन याचिका फेल, तरी आर्यन खानने वाजविली उच्च न्यायालयाची 'बेल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 18:14 IST2021-10-20T18:13:51+5:302021-10-20T18:14:40+5:30
Aryan Khan Bail Plea in High court: आर्यन खानला जामिन मिळण्यासाठी शाहरुख खान जंग जंग पछाडत आहे. NDPS कोर्टाने दिलेली आदेशाची कॉपी घेऊन उच्च न्यायालयात जामिन याचिका दाखल करण्यात आली आहे.

Aryan Khan Drugs Case: 16 दिवसांत चार जामिन याचिका फेल, तरी आर्यन खानने वाजविली उच्च न्यायालयाची 'बेल'
गेल्या आठवड्यात दोन वकील आणि तब्बल दोन दिवस जामिनासाठी युक्तीवाद करूनही आर्यन खानला (Aryan Khan) आज जामिन मिळाला नाही. स्पेशल NDPS कोर्टाने आर्यन खानसह तिघांचा जामिन नाकारला. गेल्या 16 दिवसांत आर्यन खानवर ही चौथ्यांदा वेळ आली आहे. यामुळे आता जामिनासाठी आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
स्पेशल NDPS कोर्टाचे न्यायधीश व्ही व्ही पाटील यांनी आज आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांची जामिन याचिका फेटाळली. तीनदा जामिन फेटाळल्याने आज जामिन मिळेल अशी आशा शाहरुख खान, वकिलांना होती. मात्र, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. आता पुन्हा काही दिवस आर्यनला तुरुंगात रहावे लागणार आहे. यावर समीन वानखेडेंनी 'सत्यमेव जयते' म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आर्यन खानला जामिन मिळण्यासाठी शाहरुख खान जंग जंग पछाडत आहे. NDPS कोर्टाने दिलेली आदेशाची कॉपी घेऊन उच्च न्यायालयात जामिन याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर जामिन याचिका दाखल करण्यात आली आहे. आर्यन खानला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
एनसीबीची (Narcotics Control Bureau-NCB) कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा आता वाढवली आहे. आर्यनला स्वतंत्र आणि स्पेशल बॅरेकमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक पातळीवर आर्यन खानवर लक्ष ठेवलं जात आहे. आर्यन खान आणि एका अभिनेत्रीमध्ये चॅटिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.