अरुण गवळीला ‘कोरोना’ची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 22:06 IST2021-02-10T22:05:53+5:302021-02-10T22:06:48+5:30
Arun Gawli: मागील दोन ते तीन दिवसांपासून गवळीची प्रकृती खराब झाली होती. यासंदर्भात तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तुरुंग प्रशासनाने या सर्वांना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले आहे.

अरुण गवळीला ‘कोरोना’ची लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. गवळीसमवेत पाच कैद्यांना लागण झाल्याने नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनात खळबळ माजली आहे. कारागृहाच्या आत ‘कोरोना’ पसरल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Arun Gawli corona positive.)
मागील दोन ते तीन दिवसांपासून गवळीची प्रकृती खराब झाली होती. यासंदर्भात तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गवळी व इतर कैद्यांची ‘कोरोना’ चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. तुरुंग प्रशासनाने या सर्वांना वेगवेगळ््या बॅरेकमध्ये ठेवले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात २०१२ साली गवळीसह १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.