उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:14 IST2019-08-06T17:59:02+5:302019-08-06T18:14:31+5:30
ही कारवाई वागळे इस्टेस्ट गुन्हे शाखेने केली आहे.

उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणाऱ्यास अटक
ठाणे - सिनेमा आणि टीव्ही सीरियल तसेच जाहिरातीमध्ये काम मिळवून देतो अशी बतावणी करत उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक कारणाऱ्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संदीप महादेव व्हारंबले उर्फ स्वप्निल महाजन उर्फ संदीप पाटील उर्फ सँडी (३२) असं या आरोपीचं नाव असून याला ठाणे पोलिसांनीअटक केली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील विविध पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने आतापर्यंत एकूण १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची १० ते १५ लाखांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वागळे इस्टेस्ट गुन्हे शाखेने केली आहे.
ठाणे - सिनेमा आणि टीव्ही सीरियल तसेच जाहिरातीमध्ये काम मिळवून देतो अशी बतावणी करत उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक कारणाऱ्यास बेड्या https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) August 6, 2019