शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 20:28 IST

या तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देसचिन राजेंद्र यादव (२५), दीपक दलाई जैस्वाल (२९) आणि रवी उर्फ अमर अंदेशप्रताप सिंग (२९) अशी या तीन आरोपींची नावे आहेत. अंगझडतीत पोलिसांना देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसं आढळून आली. शस्त्र घेऊन मोहम्मद रात्रीच्या वेळी संशयितरित्या फिरत होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईपोलिसांनी १४४ आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. अंधेरी परिसरात पोलिसांनी विकास अटवाल, राॅबीन दास या दोघांना देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसांसह अटक केली. तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पोलिसांनी अंधेरी येथे त्रिकुटाला बेकायदेशीर शस्त्रांसह अटक केली आहे. सचिन राजेंद्र यादव (२५), दीपक दलाई जैस्वाल (२९) आणि रवी उर्फ अमर अंदेशप्रताप सिंग (२९) अशी या तीन आरोपींची नावे आहेत. 

यादवकडून ७.६५ एमएमची पिस्तूल, जैस्वालकडून दोन मॅगझीन आणि चार जिवंत काडतुसे तर रवीकडून ७.६५ एमएमची पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केली आहे. तसेच ट्राॅम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरातून मोहम्मद आलम हासीम शेख यालाही पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसासह अटक केली आहे. या तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीत परिसरात काहीजण घातक शस्त्र घेऊन लूट करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंधेरी येथील एम.ए.रोडवर पाळत ठेवून संशयित हालचालीवरून राॅबीन दास याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसं आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने तो मूळचा कोलकत्ताचा रहिवाशी असल्याचे सांगून शस्त्र तस्करीसाठी मुंबईत आल्याचं सांगितले. दुसरीकडे विकास अटवाल याला देशी कट्टासह जोगेश्वरीच्या आनंदनगर येथील पाटीलपूत्र येथून अटक केली आहे. तसंच ट्राॅम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरातून मोहम्मद आलम हासीम शेख याला देशी कट्टा आणि काडतुसासह  अटक केली आहे. शस्त्र घेऊन मोहम्मद रात्रीच्या वेळी संशयितरित्या फिरत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून त्याला अटक केली. मोहम्मदने हे शस्त्र कशा करता आणले होते याची पोलीस माहिती घेत आहेत.  

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक