शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

थेरपीच्या बहाण्याने महिलांचा विनयभंग करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 3:03 AM

crime news : एरीक अंकलेसरिया (४५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो बँकिंग क्षेत्रातील प्रसिद्ध वक्ता आहे. नवी मुंबई पोलिसांनी त्याला माटुंगा येथून अटक केली आहे.

-   सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : फिजिओ थेरपीच्या बहाण्याने महिलांचे मोबाइल नंबर मिळवून, त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनीअटक केली आहे. एरीक अंकलेसरिया (४५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो बँकिंग क्षेत्रातील प्रसिद्ध वक्ता आहे. नवी मुंबईपोलिसांनी त्याला माटुंगा येथून अटक केली आहे.तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिजिओथेरपी करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार केली होती. या व्यक्तीने तिला व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडीओ कॉल केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा १चे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरी होता. या वेळी ज्या फोनवरून त्या महिलेला व्हिडीओ कॉल आला तो नंबर ठराविक वेळीच वापरला जात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. यातून मिळालेल्या माहितीवरून रविवारी भांडुप येथून एरीक अंकलेसरिया (४५) याला राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले. त्याच्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबईत गुन्हे दाखल आहेत. त्याने ५०० हून अधिक महिलांचा विनयभंग केल्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतल्या एका पॉक्सोच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.

अशी झाली उकलएरीक हा स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून फिजिओथेरपी सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करून एका रुग्णाला गुप्तांगाची थेरपी हवी असल्याचे सांगायचा. त्यानंतर स्वतःच हॉस्पिटलमध्ये जाऊन थेरपीदरम्यान महिलांचा मोबाइल नंबर मिळवायचा. त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेला अश्लील व्हिडीओ कॉल करायचा, तर पकडले जाऊ नये, यासाठी प्रत्येक महिलेला एकदाच संपर्क साधायचा. त्यासाठी तो वेगळा मोबाइल नंबर वापरत होता. मात्र, एकाच दिवशी त्याने कोलकाता व मुंबई येथून दोन महिलांना कॉल केल्याने पोलिसांनी त्या दिवशीच्या विमान प्रवाशांची यादी तपासली. त्यात एरीक याचे नाव समोर आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस