बलात्कार करून महिलेला मारहाण करणाऱ्याला देहू पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:42 IST2020-07-28T21:41:44+5:302020-07-28T21:42:26+5:30

पीडित महिला मेडिकल मध्ये औषध आणण्यासाठी जात असताना घडला होता हा प्रसंग

Arrested accused who rape and beating a women | बलात्कार करून महिलेला मारहाण करणाऱ्याला देहू पोलिसांनी केली अटक

बलात्कार करून महिलेला मारहाण करणाऱ्याला देहू पोलिसांनी केली अटक

पिंपरी : बलात्कार करून पीडितेस मारहाण करून फरार झालेल्या तरुणासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनीअटक केली. आरोपीच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांना रामवाडी, येरवडा येथून जेरबंद करण्यात आले. देहूरोड पोलिसांनी ही कारवाई केली.
साजन मनू मेहरा (वय २६, रा. देहूरोड बाजार) व अनिकेत रणवीर झंझोटड (वय २२, एमबी कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मेडिकलमधून औषध घेण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी साजन मेहरा याने महिलेला दुचाकीवर बसवून मुंबई महामार्गालगत झाडाखाली जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने व त्याचा साथीदार आरोपी अनिकेत झंझोटड यांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले.
पीडित महिलेने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन ते वापरत असलेल्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर आरोपींना रामवाडी, येरवडा येथून जेरबंद केले. पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर तपास करीत आहेत.
देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, गणेश जगदाळे, सचिन शेजाळ, सुमित मोरे यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Arrested accused who rape and beating a women