बंदूक विकण्यासाठी आलेल्या इसमाला बेड्या, बदलापूर पूर्व पोलिसांची कात्रप परिसरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 22:30 IST2022-02-02T22:30:20+5:302022-02-02T22:30:52+5:30
Crime News : बदलापूरच्या कात्रप परिसरातील व्हिलेज कट्टा हॉटेलसमोर असलेल्या अष्टविनायक वास्तू प्रकल्पाजवळ एक तरुण विनापरवाना पिस्टल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांना मिळाली होती.

बंदूक विकण्यासाठी आलेल्या इसमाला बेड्या, बदलापूर पूर्व पोलिसांची कात्रप परिसरात कारवाई
बदलापूर : बदलापुरात विनापरवाना देशी पिस्टल विकण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर पूर्व पोलिसांनी कात्रप परिसरात रविवारी संध्याकाळी ही कारवाई केली.
बदलापूरच्या कात्रप परिसरातील व्हिलेज कट्टा हॉटेलसमोर असलेल्या अष्टविनायक वास्तू प्रकल्पाजवळ एक तरुण विनापरवाना पिस्टल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव जय खिच्ची असून तो अष्टविनायक वास्तू प्रकल्पात राहणारा असल्याचे समोर आले. त्याच्या झडतीत त्याच्या ताब्यात विकण्यासाठी आणलेले एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतूस आढळून आले. त्यामुळे या तरुणाविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिली.