पोलिसांनाच ५० हजारांची लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:30 IST2019-11-06T20:27:12+5:302019-11-06T20:30:25+5:30
३ पोलिसांना एसीबीने अटक केली आहे.

पोलिसांनाच ५० हजारांची लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक
कल्याण - कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ५० हजारांची लाच घेताना ३ पोलिसांना एसीबीने अटक केली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हरिष कांबळे (३४), पोलीस हवालदार अंकुश नरवणे (५७), पोलीस नाईक भरत खाडे (४९) यांना एसीबीने अटक केली आहे.
गुटखा वाहतुकीची खोटी केस न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या ३ पोलिसांना ठाणे एसीबीने रंगेहात अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले पोलीस चौक पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक हरिष कांबळे, पोलीस हवालदार अंकुश नरवणे, पोलीस नाईक भरत खाडे यांनी तक्रारदाराविरोधात गुटखा वाहतुकीची खोटी केस न करण्यासाठी ५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड लाख रक्कम ठरविण्यात आली. यातील लाचेचा दुसरा हफ्ता ५० हजार रुपये स्वीकारताना या तिघांना ठाणे एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.