शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

तरुणाच्या खुनाचा प्रयत्न प्रकरणात गॅगस्टर बंडु आंदेकरसह दोघांना अटक; ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 10:02 AM

टोळीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर आंदेकरच्या इशाराने केले होते वार

पुणे: आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरल्याने तसेच पूर्ववैमनस्याने तरुणावर कोयता, पालघन सारख्या हत्याराने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी बंडु आंदेकर व त्याच्या टोळीतील ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बंडु ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६०), ऋषभ देवदत्त आंदेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. बंडु आंदेकर याच्या इशार्‍यावरुन हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. खडक पोलिसांनी काल रात्री आंदेकर याला नाना पेठेतील राहत्या घरातून अटक केली. 

याप्रकरणी ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ, बाबु आळी) याने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.शहराच्या मध्य वस्तीतील नाना पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ परिसरात आंदेकर टोळीचे वर्चस्व आहे. आंदेकर कुटुंबातील दोघे जण सध्या नगरसेवकही आहेत.

ओंकार कुडले आणि आंदेकर टोळी यांच्या यापूर्वी अनेकदा वादावादी झाली आहे. ओंकार कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याचे बंडु आंदेकर याला वाटू लागले होते. त्यातूनच त्याच्या सांगण्यावरुन व पूर्ववैमनस्यातून ऋषभ आंदेकर, गाडी गण्या, सुरज व इतर अशा ५ जणांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ओंकार याच्यावर कोयता, पालघन अशा धारधार हत्याराने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कुडले याच्या फिर्यादीनंतर मंगळवारी रात्री उशिरा बंडुअण्णा आंदेकर व ऋषभ आंदेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

आंदेकर - माळवदकर या दोन टोळ्यांमधील टोळी युद्धात दोन्ही टोळ्यांमधील अनेकांचे खुन पडले. माळवदकर टोळी नेस्तनाबूत झाली. मात्र, आंदेकर टोळीने आपले वर्चस्व गेल्या साडेतीन दशकापासून पूर्व भागात कायम ठेवले आहे.  या टोळीयुद्धात बंडु आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. १९८५ पासून बंडु आंदेकरवर याच्या खून, खुनाचा प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे अपहरण अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हा फरासखाना, खडक व समर्थ पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक