शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे फोन करून २५ लाख मागणाऱ्या संशयितास अटक; तीन दिवसांची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 17:46 IST

एका रुग्णालयात फोन 25 लाखांची केली होती मागणी, तसेच पैसे न दिल्यास बघून घेण्याची दिली होती धमकी

ठळक मुद्देनिगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने रुग्णालयात फोन करून २५ लाखांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास बघून घेऊ, अशी धमकी दिली. याप्रकरणी एका संशयित तरुणाला गुरुवारी (दि. २३) पहाटे निगडीपोलिसांनी पुण्यातून जेरबंद केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सौरभ संतोष अष्टूल (वय २१, रा. लोहियानगर, गल्ली क्रमांक १, गंजपेठ, पुणे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तरुणाने शनिवारी (दि. १८) दुपारी चारच्या सुमारास निगडी येथील एका नामांकित रुग्णालयात फोन केला. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून मी दादाचा पीए सावंत बोलतोय. कोरोनाच्या महामारीमुळे गरिबांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताबडतोब २५ लाख रुपये आमच्या पर्वतीच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या, नाहीतर तुमचे हातपाय तोडून जिवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपी याने फोनवरून दिली. याप्रकारानंतर संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून शहानिशा केली. आपण किंवा आपल्या कार्यालयातून कोणीही असा फोन करून पैसे मागितले नाहीत, असे पाटील यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. त्यानुसार रुग्णालयातर्फे संबंधित डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतली. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, महेंद्र आहेर, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, सतीश ढोले, विलास केकाण, रमेश मावसकर, सोपान बोधवड, आत्मलिंग निंबाळकर, सुनील जाधव, भुपेंद्र चौधरी, विनोद व्होनमाने, विजय बोडके, तुषार गेंगजे, राहुल मिसाळ, तानाजी सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

मोबाईल, सिमकार्ड, दुचाकी जप्ततपासासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी याची माहिती मिळविली. त्यानुसार पुणे येथे सापळा लावून गुरुवारी पहाटे कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. गुन्ह्यात वापरलेला एक मोबाईल, एक सिमकार्ड व दुचाकी असा ३५ हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेnigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकBJPभाजपाhospitalहॉस्पिटल