Video : शरद पवारांना अटक करा अन्यथा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावू; वकील गुणरत्न सदावर्तेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 21:56 IST2021-09-05T21:24:47+5:302021-09-05T21:56:15+5:30
Sharad Pawar And Dilip Walse-patil : ही गर्दी जमणाऱ्यांविरुद्ध म्हणजेच शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र वकील सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.

Video : शरद पवारांना अटक करा अन्यथा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावू; वकील गुणरत्न सदावर्तेंचा इशारा
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांनी कोरोना नियम तोडत जुन्नर-आंबेगाव पुणे येथे गर्दी जमून ज्याप्रकारे सभा केली. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल २१ इतरांच्या जीवनाचा अधिकार त्यावर गदा येते आणि इतर लोक ह्या मुळे संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे ही गर्दी जमणाऱ्यांविरुद्ध म्हणजेच शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र वकील सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.
शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का? आणि कॅव्हिडचे नियम तोडल्यामुळे पुण्यात भरभरून गर्दी करून लोकप्रतिमा तयार करून केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकांना एकत्र आणणे आणि इतर लोकांना वेठीस पकडणे हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल २१ ला हे अभिप्रेत नाही. शरद पवार कायद्यापेक्षा मोठे नाहीत. दिलीप वळसे पाटील तुम्ही मंत्री आहेत. परंतु तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. सामान्यांनी जर विवाहासाठी जास्त लोकं जमवले, तर तिथे धाड पडते. शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील हे तुफान गर्दी जमवतात. माध्यमांत बातम्या येतात. इथे धाड टाकण्यासाठी अधिकाऱ्यांना हातात बेड्या पडल्या आहेत का? शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर कारवाई करा. अन्यथा तुम्हाला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला थांबवता येणार नाही आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता माझा तुम्हाला स्पष्ट प्रश्न आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. सामान्यपणे ७ वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसणाऱ्यांना अटक करून तुम्ही शूरता दाखवता. शरद पवारांना अटक करायला तुमच्याकडे शूरता नाही का? अटक करावी लागेल आणि अटक जर नाही केली तर आम्ही या सर्व बाबी आम्ही कारवाई नाही झाली म्हणून, FIR नाही झाला म्हणून मुंबई उच्च न्यायालयासमोर आणि राज्यपालांसमोर ठेवू असा असंतोष वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का?, असा प्रश्न वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलाय pic.twitter.com/6pJBigXaQp
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021