Arnab Goswami's Whatsapp chat tweeted by Prashant Bhushan and said it would be enough proof to go jail for long life | अर्णब गोस्वामीचं Whatsapp चॅट प्रशांत भूषण यांनी केलं ट्वीट अन् म्हटले जेलमध्ये जाण्यासाठी हा पुरावा पुरेसा

अर्णब गोस्वामीचं Whatsapp चॅट प्रशांत भूषण यांनी केलं ट्वीट अन् म्हटले जेलमध्ये जाण्यासाठी हा पुरावा पुरेसा

ठळक मुद्देकायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत.   

बहुचर्चित वकील प्रशांत भूषण यांनी खळबळजनक दावा केला आहे की, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे एक कथित whatsApp चॅट पसरले आहे. प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कथित WhatsApp चॅट शेअर केले आहे. त्याच्या मते, हे चॅट अर्णब गोस्वामी आणि रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ यांच्यामधील झालेली बातचीत आहे. 

प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलचे स्क्रीनशॉट शेअर करत असे लिहिले आहे की, हे बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेल्या चॅटचे पसरलेले फोटो आहेत. या फोटोंवरून गोस्वामी यांच्या काटकारस्थानाचा पोल खोल होते. प्रशांत भूषण यांनी पुढे असे लिहिले आहे की, याबरोबर असंही उघड होतं , कशाप्रकारे मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर केला गेला आहे. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत.   

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे सीईओ यांच्यातील WhatsApp चॅट लीक झालेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ट्विटर युजर्स अर्णब गोस्वामी हॅशटॅगसह कथित चॅट शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत. प्रशांत भूषण यांच्या याच ट्वीटवर कमेंट करताना पत्रकार मीना दास नारायण यांनी लिहिले आहे की, आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू ? एक कारण सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू. प्रशांत भूषण यांच्या या ट्वीटवर परवेज खान या युजरने या ब्रेकींग न्यूजला कोणतंही मीडिया हाऊस का कव्हर करत नाहीय असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

Web Title: Arnab Goswami's Whatsapp chat tweeted by Prashant Bhushan and said it would be enough proof to go jail for long life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.