शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

रायगड पोलिसांची 'ती' विनंती कोर्टाकडून मान्य; गोस्वामींच्या अडचणी वाढणार?

By कुणाल गवाणकर | Published: November 09, 2020 8:07 PM

अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता

रायगड: अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गाेस्वामी यांची तीन तास चाैकशी करण्यास रायगड पाेलिसांना न्यायालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील ऍड. प्रदिप घरत यांनी दिली. पाेलिसांना तीन चाैकशीसाठी दिले असले तरी गाेस्वामी यांची सलग पाेलिस चाैकशी करण्याची आमची मागणी असल्याकडे ऍड. घरत यांनी लक्ष वेधले.

अर्णब गाेस्वामी यांना देण्यात आलेल्या न्यायालयीन काेठडीला रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले हाेते. त्यावर आज सुनवाणी पार पडली. आराेपीचे वकील हे वेळकाढूपणा करत आहेत. पाेलिस काेठडीची परवानगी आम्हाला मिळाली तर आराेपींच्या वकीलांना युक्तीवाद करता येणार नाही. गाेस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय आमच्या पुनर्निरीक्षण अर्जा आधी कसा हाेईल यासाठी आराेपींचे वकील प्रयत्न करत आहेत. गाेस्वामी यांच्या वकिलांनी तर दाेन्ही अर्जावर एकाच वेळी सुनावणी घ्यावी अशी न्यायालयाला प्रार्थना केली. त्याला आम्ही कडाडून विराेध केला असेही ऍड. घरत यांनी स्पष्ट केले.अर्णब गोस्वामींची दिवाळी कुठे? निर्णय अलिबाग सत्र न्यायालयाच्या हातातगाेस्वामी यांची न्यायालयानी काेठडीतच पाेलिस चाैकशी करता यावी यासाठी रायगड पाेलिसांनी तीन तासांची वेळ मागीतली हाेती ती न्यायालयाने मंजूर केली आहे. तपासकामात प्रगती हाेण्यासाठी अशी मागणी रायगड पाेलिसांनी केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गाेस्वामी यांची सलग चाैकशी करता यावी अशी आमची मागणी आहे. तसे झाल्यास या प्रकरणाचा सखाेल तपास करता येईल. आराेपी तपासात सहकार्य करत नाही असेही ऍड. घरत यांनी स्पष्ट केले.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गाेस्वामी यांना अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गाेस्वामी यांना केलेली अटक बेकायदा नाही असे उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. तसेच तपास पुढे सुरु ठेवण्यासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक हाेती. त्यामुळे पाेलिसांचा तपास हा बेकायदा आहे असे आराेपींच्या वकीलांचे म्हणणे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे, असेही ऍड. प्रदिप घरत यांनी सांगितले.अती तिथे मातीच! अर्णबबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा एकही व्यक्ती नाही- अशोक चव्हाणअलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेला पुनर्निरीक्षण अर्ज कायद्याच्या कसाेटीवर टिकणारा आहे का असा प्रश्न आराेपी नितेश सारडा यांच्या वकीलांनी न्यायालयात उपस्थित केला. त्या अर्जावर मंगळवारी 10 नाेव्हेंबर राेजी सुनावणी हाेणार आहे. याचवेळी गाेस्वामी यांच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी हाेण्याची शक्यता आहे, असे अर्णब गाेस्वामी यांचे वकील ऍड. अंकित बंगेरा यांनी सांगितले.

अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक (Anvay Naik) आणि त्यांच्या आई कुमूद यांनी २०१८ मध्ये रायगडमध्ये आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी, फिरोझ शेख आणि नितीश सारडा जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. या तिघांनी आपले ५.४० कोटी रुपये थकवल्याचं अन्वय यांनी सुसाईट नोटमध्ये म्हटलं होतं. अर्णब गोस्वामींसाठी फडणवीसांची वकिली, हायकोर्टाला कळकळीची विनंतीअर्णब आणि अन्वय यांच्यात कशावरून वाद झाला?अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.पोलीस तपासातून काय समोर आलं?२०१८ मध्ये अन्वय आणि त्यांची आई कुमूद यांचे मृतदेह रायगडमधील काविर गावी आढळून आले. अन्वय यांचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर लटकलेल्या स्थितीत सापडला. तर कुमूद यांचा मृतदेह  तळमजल्यावर आढळला. अन्वय यांच्यावर डोक्यावर मोठं कर्ज होतं आणि त्यांना कंत्राटदारांची देणी देणं कठीण जात होतं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी २०१८ मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र २०१९ मध्ये पोलिसांनी प्रकरणाची फाईल बंद केली. यानंतर अन्वय यांच्या मुलीनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर देशमुखांनी प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले. देशमुख यांनी मे महिन्यात ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती.अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी ऑगस्टमध्ये ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत गोस्वामी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. 'अर्णब गोस्वामी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून आरडाओरड करत आहेत. पण गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केलेल्या माझ्या पती आणि त्यांच्या आईचं काय? आमच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार? या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही?,' असे प्रश्न अक्षता यांनी विचारले होते.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामी