जळगावात भरदिवसा SBI च्या शाखेवर सशस्त्र दरोडा! पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:12 IST2023-06-01T13:12:16+5:302023-06-01T13:12:42+5:30
घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.

जळगावात भरदिवसा SBI च्या शाखेवर सशस्त्र दरोडा! पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल
जळगाव- शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेवर आज भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला. या घटनेत लाखो रुपयांची रोकड आणि सोने दरोडेखोरांनी लांबवले आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.
दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याची माहिती असून त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले होते. या दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून रोकड आणि सोन्याचे दागिने लांबवले आहेत. एवढेच नाही, तर दरोडेखोरांनी बँकेच्या मॅनेजरवरही शस्त्राने वार केले आहे.
पोलीस घटनेची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या दरोड्याच्या घटनेने जळगावात एकच खळबळ उडाली आहे.