चेष्टा मस्करीतून झाला वाद; कोयत्याने केले वार; एक जण गंभीर जखमी; डोणजे येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 16:42 IST2021-01-05T16:41:56+5:302021-01-05T16:42:11+5:30

डोणजे येथील जिव्हाळा फार्म हाउस येथे काल सोमवारी रात्री ही घटना घडली.

The argument turned out to be a joke; Scythe; One seriously injured; Types at Donje | चेष्टा मस्करीतून झाला वाद; कोयत्याने केले वार; एक जण गंभीर जखमी; डोणजे येथील प्रकार

चेष्टा मस्करीतून झाला वाद; कोयत्याने केले वार; एक जण गंभीर जखमी; डोणजे येथील प्रकार

खडकवासला: मस्करीतून शिव्या दिल्याच्या रागातून कोयत्यासह हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. डोणजे येथील जिव्हाळा फार्म हाउस येथे काल रात्री ही घटना घडली. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेखर शिवाजी पारगे ( रा. डोणजे, ता. हवेली) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे  नाव आहे. सज्जद शेख ( रा डोणजे, ता. हवेली) असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. दोघेही मित्र असून सिंहगड पायथ्याशी असलेल्या जिव्हाळा फार्म हाउस येथे काल आपल्या मित्रासह जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे गप्पांच्या मस्करीतून दोघांमध्ये वाद झाले. वादातून दोघामध्ये शिवीगाळ झाली होती. शेख तेथुन निघुन गेला आणि थोड्या वेळात परत येउन शेखर पारगेवर हल्ला केला.  शेख फरार हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम करत आहेत. 

Web Title: The argument turned out to be a joke; Scythe; One seriously injured; Types at Donje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.