शारिरीक संबंधातून वाद; पत्नीनं मारली विहिरीत उडी, पतीनं आधी वाचवलं अन् नंतर केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:42 IST2023-04-18T19:41:46+5:302023-04-18T19:42:23+5:30
पती-पत्नी दारू प्यायले, नंतर पत्नीने शरीर सुखासाठी नकार दिला...

शारिरीक संबंधातून वाद; पत्नीनं मारली विहिरीत उडी, पतीनं आधी वाचवलं अन् नंतर केली हत्या
Chhattisgarh News:छत्तीसगडच्या जशपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये शारिरीक संबंधावरून वाद झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली. सोमवारी रात्री पती-पत्नी दारू पिऊन झोपायला गेले, यावेळी पतीने पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. पत्नीने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.
यानंतर संतापलेल्या पत्नीने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. पतीने पत्नीला विहिरीतून बाहेर काढले, पण लगेच तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. ही घटना बागिचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रौनी गावात घडली. शंकर राम असे आरोपीचे नाव असून, आशाबाई असे मृत पत्नीचे नाव आहे.
पतीने पत्नीला विहिरीबाहेर काढल्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टवर वार करुन तिची हत्या केली. यानंतर तो रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. सकाळी गावात याची माहिती पसरली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी शंकरला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.