धक्कादायक! आई-बाप आहेत की शैतान, जीवापाड जपलेल्या मुलीलाच विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:20 IST2025-04-15T12:18:19+5:302025-04-15T12:20:01+5:30

उत्तर प्रदेशातील कौशांबीच्या करारी भागातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

Are the parents the devil, they sold the girl they saved for their own life | धक्कादायक! आई-बाप आहेत की शैतान, जीवापाड जपलेल्या मुलीलाच विकले

धक्कादायक! आई-बाप आहेत की शैतान, जीवापाड जपलेल्या मुलीलाच विकले

आई-वडिलांसारखं जगात कुणीच आपल्यावर प्रेम करत नाही असं म्हणतात. त्यांची मुलं त्यांच्यासोबत कशीही वागली तरीही त्यांचं प्रेम कमी होत नाही. एक आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. पण, सध्या उत्तर प्रदेशातील कौशांबी येथून एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यामध्ये आईच्या नात्याला कलंक लावला आहे. आई वडिलांनी त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीला दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांना विकल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील कौशांबीच्या करारी भागातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पालकांनी त्यांच्या १३ वर्षांच्या निष्पाप मुलीला दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांना विकले. त्यांनी मुलीला फक्त ५ लाख रुपयांना विकले. आधी त्यांनी त्यांच्या मुलीला ड्रग्ज दिले आणि नंतर तिला बेशुद्ध अवस्थेत विकले. 

वो बुलाती है मगर जाने का नही..! नजरेनं 'ती' करते घायाळ; आतापर्यंत ५० जण फसले, पोलीस हैराण

आई-वडिलांनी ज्या व्यक्तीला मुलीला विकले त्या व्यक्तीने मुलीला तीन दिवस ओलीस ठेवले. तिच्यासोबत वाईट कृत्ये केली. त्या मुलीला हे सगळं कसं घडलं हे कळलंही नाही, तिला शुद्ध आली तेव्हा ती तिच्या आईवडिलांच्या घरी होती. तिला सर्व गोष्टी लक्षात आल्या त्यावेळी वेळ गेली होती. पण,, तरीही तिने हिंमत सोडली नाही.

एका १३ वर्षांच्या मुलीला तिच्या पालकांनी ५ लाख रुपयांना विकले. तिला तीन दिवस ओलीस ठेवून लैंगिक अत्याचार केले. मुलगी हळूच त्याच्या तावडीतून सुटली. तिथून ती पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांना सर्व माहिती दिली. पोलिसांनाही धक्का बसला आणि तिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांनी तिच्या पालकांसह चार जणांविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. 

Web Title: Are the parents the devil, they sold the girl they saved for their own life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.