अॅपलचा मोबाईल चोरणाऱ्या मोलकरीणाला पुणे येथे अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 20:47 IST2019-02-04T20:44:29+5:302019-02-04T20:47:56+5:30
तीन लाख रुपये किमंतीचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती.

अॅपलचा मोबाईल चोरणाऱ्या मोलकरीणाला पुणे येथे अटक
मडगाव - घोगळ येथील एका चोरी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी पुणे येथून अनुराधा पवार (३७) या संशयित महिलेला अटक केली आहे. अधिक तपासासाठी या संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. पुंडलीक पै काकोडे हे या प्रकरणातील तक्रारदार असून अंदाजे तीन लाख रुपये किमंतीचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती.
घोगळ येथील चौगुले महाविदयालयनजिक राहणाऱ्या काकोडे यांच्याकडे अनुराधा पवार या मोलकरीण म्हणून कामाला होत्या. संशयित मूळ महाराष्ट्र राज्यातील सातारा येथील आहे. आपल्या आजारी पत्नीची देखभाल करण्यासाठी काकोडे यांनी ही मोलकरीण कामावर ठेवली होती. आॅक्टोबर २0१८ ते २५ डिसेंबर २0१८ दरम्यान चोरीची ही घटना घडली.
अॅपल कंपनीचा मोबाईल संच, मंगळसूत्र तसेच कपडे चोरुन नेले आहे. भारतीय दंड संहितेच्या ३८१ कलमाखाली पोलिसांनी या प्रकरणी संशयितावर गुन्हा नोंद केला होता. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदीत्य वेळीप पुढील तपास करीत आहेत.