Video: लॉकडाऊनमध्येही वादातून रिव्हॉल्व्हरचं दर्शन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 19:24 IST2020-05-19T19:16:56+5:302020-05-19T19:24:15+5:30
सिगारेटच्या धुरातून उफाळला वाद ; चौघांना अटक

Video: लॉकडाऊनमध्येही वादातून रिव्हॉल्व्हरचं दर्शन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ठाणे - संचारबंदी सुरू असताना ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील साठेनगर परिसरात सोमवारी रात्री फिल्मी स्टाईलने रिव्हॉल्व्हरचे दर्शन झाले आहे. दोन गटाला झालेल्या हाणामारीत ती रिव्हॉल्व्हर रोखून धरण्यात आल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. सिगारेटचा धूर तोंडावर गेल्याने स्थानिक दोन गटात तो वाद उफाळून आला. यामध्ये रिव्हॉल्व्हर रोखून धरणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर,याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल करत दोन गटातील चौघांना अटक केली. तसेच व्हिडिओमध्ये एक गट दुसऱ्या गटावर दगडफेक करताना दिसत असल्याचे ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
सिगारेटचा धूर तोंडावर गेलेल्या रागातून सुरज यादव आणि फरार अमर तुषांबर या दोन गटात वाद झाला. ते दोघेही स्थानिक असून त्या दोन गटात सोमवारी रात्रीच्या सुमारास मोठ्याप्रमाणात वाद उफाळून आला.यामध्ये सुरज आणि मलकीत उर्फ पेरू हे वेगवेगळ्या दोन गटातील दोघे जखमी झाले आहेत. त्या दोघांसह आणखी दोघांना अशा चौघांना अटक केली. तर याचदरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओत अमर हा फिल्मी स्टाईलने रिव्हॉल्व्हर काढून रोखून धरून आपली दहशत निर्माण करताना दिसत आहे.
याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करत, एका गटातील तिघांना तर दुसऱ्या गटातील एकाला अशा चौघांना अटक केली आहे. तर फरार रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्याचा शोध सुरू आहे. ते दोन गट स्थानिक असून त्यांच्यात किरकोळ वादातून हा प्रकार झाला आहे. - विजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे.
ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील साठेनगर परिसरात सोमवारी रात्री फिल्मी स्टाईलने रिव्हॉल्व्हरचे दर्शन झाले pic.twitter.com/NuRzuJjuX3
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2020