प्यार मे कुछ भी...विवाहबाह्य संबंधातून पत्नीने  पतीच्या खुनाची दिली दीड लाखांची सुपारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 16:11 IST2018-07-28T16:11:19+5:302018-07-28T16:11:52+5:30

तडजोड करत ती दीड लाखात सुपारी ठरली

Anything in lov ... Out of the extramarital affair, the wife gave her husband's betrayal of betel-ninety lakhs | प्यार मे कुछ भी...विवाहबाह्य संबंधातून पत्नीने  पतीच्या खुनाची दिली दीड लाखांची सुपारी 

प्यार मे कुछ भी...विवाहबाह्य संबंधातून पत्नीने  पतीच्या खुनाची दिली दीड लाखांची सुपारी 

विरार - पत्नीने विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येची सुपारी दिली. पतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विरार पश्चिम येथील रानपाडा परिसरात काल रात्री ३ वाजताच्यादरम्यान ऍक्टिवावरून (एमएच ४८, आर १२) जात होते. पोलीस गस्तीवर असताना त्यांना संशय आला आणि त्यांनी ऍक्टिवाचा पाठलाग करत आरोपींना अटक केली आहे. 

विरार पश्चिम येथील एमबी इस्टेट येथे राहणारे योगेश आणि अश्विनी राऊत. यांचा विवाहाला दहा वर्ष झाली असून त्यांना एक १० वर्षांचा आणि दुसरा ८ वर्षांचा मुलगा आहे. संसार १० वर्ष अगदी सुखात सुरु होता. मात्र सुखात विरजण पडलं ते विवाहबाह्य संबंधाचं. विवाहानंतर देखील अश्विनीचं राजअर्जुनशी प्रेमप्रकरण सुरु होतं. याचा सुगावा योगेश राऊत यांना लागला आणि त्यामुळे घरी नवरा - बायकोमध्ये भांडण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रोजच्या भांडणाला वैतागून अश्विनी आणि तिचा प्रियकर राजअर्जुन यांनी योगेशच्या काटा काढायचा ठरवले. त्यांनी राजअर्जुनचा मित्र फैय्याज आणि फैय्याजचा मित्र जावेदला अडीज लाखाची योगेशला मारण्याची सुपारी दिली. मात्र, तडजोड करत ती दीड लाखात सुपारी ठरली. त्यानंतर घरातील ओढणीच्या सहाय्याने फैय्याज आणि जावेदने योगेशच्या गळा आवळून ठार केले. नंतर योगेशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ऍक्टिवावरून रानपाडा तलावानजीक असलेल्या मैदानात ते ऍक्टिव्हवरून पोचले. एका बेडशीटमध्ये गुंडाळलेला मृतदेह त्यांनी मैदानात टाकला आणि तेथून पळ काढत असताना गस्तीवर असलेल्या अर्नाळा पोलिसांनी दोघांना पकडले आणि या खुनाचा छडा लागला. अर्नाळा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२, २०१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Anything in lov ... Out of the extramarital affair, the wife gave her husband's betrayal of betel-ninety lakhs