विवाहितेच्या खून प्रकरणात सासू-सासऱ्यांसह चौघांचा अटकपूर्व फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 04:10 PM2020-08-04T16:10:45+5:302020-08-04T16:11:30+5:30

या प्रकरणात सहा जणांविरुध्द हुंडाबळी, खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात कोणालाच अटक झालेली नाही.

anticipatory bail of four persons, including in-laws rejected in the murder case of a married woman women | विवाहितेच्या खून प्रकरणात सासू-सासऱ्यांसह चौघांचा अटकपूर्व फेटाळला

विवाहितेच्या खून प्रकरणात सासू-सासऱ्यांसह चौघांचा अटकपूर्व फेटाळला

Next
ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात चौघांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी यांनी सरकारतर्फे बाजू मांडली.

जळगाव : आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाºया सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेच्या खून प्रकरणात तिचा सासरा भगवान कौतिक सोनवणे, सासू प्रमिला सोनवणे, दिर योगेश भगवान सोनवणे व दिरानी स्वाती योगेश सोनवणे या चौघांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. या प्रकरणात पोलीस कर्मचारी असलेला पती नरेंद्र भगवान सोनवणे हा देखील आरोपी असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात चौघांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. सोनाली हिचा १० जुलै रोजी पहाटे जळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात सहा जणांविरुध्द हुंडाबळी, खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात कोणालाच अटक झालेली नाही.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस

 

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

Web Title: anticipatory bail of four persons, including in-laws rejected in the murder case of a married woman women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.