शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

अज्ञात मृतदेहामुळे लागला दुसऱ्या रहस्यमयी खुनाचा तपास, पतीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 21:25 IST

Murder Case :या प्रकरणात हत्या फक्त एका महिलेची करण्यात आली होती. मात्र पोलीस दोन मृतदेहांचा तपास करत होते. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहे.

एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावण्यात आली. ज्या पद्धतीने त्याने मृतदेह दूर कुठेतरी फेकून दिला होता याची त्याला खात्री होती की त्याच्यावर कोणीही संशय घेणार नाही. त्यामुळे तो बेफिकीर होता. मात्र त्याच व्यक्तीच्या शहरातून वाहणाऱ्या नदीतून पोलिसांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर जे काही घडले ते अतिशय आश्चर्यकारक होते. या प्रकरणात हत्या फक्त एका महिलेची करण्यात आली होती. मात्र पोलीस दोन मृतदेहांचा तपास करत होते. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहे.

कौशलपुरी भागातील ३६ वर्षीय गृहिणी अंजना अचानक घरातून बेपत्ता झाली. घरच्यांनी खूप शोध घेतला. मात्र, काही सुगावा लागला नाही. यानंतर प्रथम अंजनाची बहीण बबलीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली आणि त्यानंतर अंजनाचा पती सुलभ याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. मात्र, सुलभाने तक्रारीत म्हटले आहे की, त्याची पत्नी त्याच्यावर रागावून कुठेतरी निघून गेली होती, तर बहीण बबली अंजनाच्या बेपत्ता होण्यासाठी आपल्या भावोजी सुलभला जबाबदार धरत होती. सुलभनेच मारल्याचेही तिने सांगितले.मात्र, पोलिसांनी दोन्ही तक्रारींकडे फारसे लक्ष दिले नाही. बबलीसह कुटुंबातील इतरांनी नझिराबाद पोलीस ठाण्यात घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण आतापर्यंत पोलिसांना अंजनाचा शोध घेता आला नाही. ७ जानेवारीला कानपूरच्या पंकी कॅनॉलमधून एका महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेह अनेक दिवसांपासून जुना असल्याने ओळख पटवणे कठीण होते. मात्र, अंजनाची बहीण बबलीने मृतदेह पाहून ओळखले आणि हा मृतदेह तिची बहीण अंजनाचा असल्याचे सांगितले. अंजनाचा पती सुलभ हा आधीच संशयाच्या भोवऱ्यात होता, अशा परिस्थितीत मृतदेह सापडताच पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली.सुलभच्या घराभोवती बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गायब होण्यापर्यंतच्या दिवसांचे फुटेज पोलिसांनी तपासले आणि या प्रयत्नामुळे सुलभ हा चांगलाच अडकला. प्रत्यक्षात, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुलभ एका कारमध्ये भरलेली सॅक घेऊन जाताना दिसत आहे. गोणीत अंजनाचा मृतदेह आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत होता.सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली. तज्ज्ञांनी त्या कारची तपासणी केली. ज्यावरून असे दिसून आले की हत्येनंतर कार साफ करण्यात आली होती, परंतु त्या कारमध्ये अजूनही रक्ताचे डाग होते. आता सुलभाकडे सत्य कबूल करण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा स्थितीत त्याने पत्नी अंजनाला ठार मारण्याचे मान्य केले नाही तर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जी कहाणी सांगितली ती अतिशय विचित्र आणि भीतीदायक होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित सुलभचे किरण नावाच्या दुसऱ्या मुलीवर प्रेम होते आणि यावरून पती-पत्नीचे संबंध चांगले नव्हते. क्रॉकरी व्यावसायिक सुलभ आणि अंजना यांचा २००८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना ११ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. येथे २२ डिसेंबर रोजी सुलभ याच्या मुलाने कोल्ड्रिंकचा आग्रह धरला. आई अंजनाने कोल्ड्रिंक आणण्यास नकार दिल्याने सुलभचा चुलत भाऊ ऋषभ याने मुलाला थंड पेय आणण्यासाठी घराबाहेर नेले आणि याच कारणावरून त्या दिवशी अंजना आणि सुलभाच्या भांडणाचे कारण बनले. रागाच्या भरात सुलभाने अंजनाला मारहाण केली आणि अंजनाने सुलभची कॉलर पकडली. हे भांडणच खुनाचे कारण ठरले आणि सुलभाने अंजनाचा गळा आवळून खून केला.सुलभच्या कारमध्ये सॅक ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे नव्हतेच, चौकशीदरम्यान सुलभने मृतदेहाची कारमध्ये विल्हेवाट लावल्याचीही माहिती दिली. त्याने सांगितले की, त्याच रात्री घरात अंजनाचा गळा आवळून मृतदेह गोणीत भरून गाडीत टाकला आणि मग तो थेट रायपुरवा येथील मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला.इथे त्याची मैत्रीण किरण, त्याचे वडील राम दयाल आणि सुलभाचा चुलत भाऊ सुलभला पाठिंबा द्यायला आधीच हजर होते. सुरुवातीला चौघांनी मिळून मृतदेहाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले. मात्र, धुराचे लोट पसरत असल्याचे पाहून चौघांनीही आग विझवली. यावेळी चौघांच्याही नखांमध्ये अंजनाच्या मांसाचे तुकडे आणि रक्ताचे काही भाग राहिला. फॉरेन्सिक तपासणीच्या बेन्झाडियन चाचणीदरम्यानही हे रक्ताचे डाग पकडले गेले. शिवाय, मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर गुन्हेगारांनी त्या फ्लॅटला रंगरंगोटीही करून घेतली, जेणेकरून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसावा असं वाटेल.

शिवाय, गुन्हेगारांच्या जॅकेट, चप्पल आणि इतर वस्तूंमध्ये रक्ताच्या खुणा आढळून आल्याने पोलिसांनी सुलभ तसेच त्याची मैत्रीण, तिचे वडील आणि चुलत भावाला पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अटक केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यात सुलभला साथ देणाऱ्या तिघांचे हेतू वेगळे होते. चुलत भाऊ भावाला साथ देत होता, प्रेयसीने प्रियकरासह भावी आयुष्याची स्वप्ने रंगवली होती, तर प्रेयसीचे म्हातारे वडीलही मुलीचे घर उभं करण्यासाठी खुनाच्या प्रकरणात भावी जावयाला साथ देत होता.पण नंतर कथेत एक जबरदस्त ट्विस्ट आला. पनकी कालव्यातून पोलिसांना सापडलेला मृतदेह अंजनाचा असल्याचं गृहीत धरत होते, तो मृतदेह अंजनाचाच असल्याचे समजले. कारण सुलभ आणि त्याच्या भावाने मृतदेह पंकी कालव्यात नाही तर तेथून 50 किमी अंतरावर असलेल्या पांडू नदीत फेकून दिला होता, जी विरुद्ध दिशेला होती. प्रत्यक्षात पंकी कालव्यातून मृतदेह मिळाल्यानंतर अंजनाची बहीण बबली हिने अर्थातच आपल्या बहिणीचा मृतदेह असल्याचं सांगितला होतं, पण हा मृतदेह आपल्या आईचा आहे. यावर अंजनाचा मुलगा मानायला तयार नव्हता.

शिवाय तो मृतदेह आपल्या आईचा मृतदेह म्हणून स्वीकारण्यास नकार देत मुखाग्नी देण्यास देखील नकार दिला, मात्र कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर त्याने होकार दिला. आता इथे आरोपी सुलभ हाही वेगळीच कहाणी सांगत होता. या कहाणीनुसार त्यांनी मृतदेह  पनकी  कालव्यात टाकला नाही तर पांडू नदीत टाकला.

सध्या पोलिसांनी अंजनाचा डीएनए नमुना पनकी कालव्यातून सापडलेल्या मृतदेहाशी जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र अहवाल येणे बाकी आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात दोन प्रश्न ऐरणीवर आले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे  पनकी कालव्यातून सापडलेला मृतदेह अंजनाचा नसून तो मृतदेह कोणाचा होता? आणि दुसरं म्हणजे अंजनाचा मृतदेह पनकी कालव्यात नाही तर पांडू नदीत फेकला गेला असेल तर तो मृतदेह गेला कुठे?

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू