शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
4
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
5
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
6
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
7
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
8
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
9
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
10
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
11
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
12
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
13
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
14
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
17
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
18
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
19
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
20
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर

न्यायालयातून पलायनानंतर आणखी एका चिमुरडीची अत्याचार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:42 IST

गुन्हा करून दोन महिने भिवंडीमध्ये वास्तव्य

भिवंडी : ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्याच्या गुन्ह्यात आरोपीस भिवंडी न्यायालयात आणले असता ताे पोलिसांना चकमा देऊन पसार झाला. त्यानंतर त्याने ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. सलामत अन्सारी (३४) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी दोन महिने शहरात होता; त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे. 

१ ऑक्टोबर रोजी ७ वर्षीय चिमुरडी  सार्वजनिक स्वच्छतागृहात गेली होती. बराच वेळ ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता एका बंद खोलीत चिमुरडीने स्वच्छतागृहात जाताना सोबत नेलेली बादली आढळली. नागरिकांनी खोलीचे कुलूप तोडून प्रवेश केला तर तेथे एका कोपऱ्यात प्लास्टिक गोणीत तिचा मृतदेह तोंडात कुरकुरे कोंबलेल्या अवस्थेत आढळला.

सात दिवसांची पाेलिस काेठडीआरोपी सलामत हा काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील एका खोलीत आठवड्यापूर्वी भाड्याने राहण्यासाठी आला होता. घटनेनंतर भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतील दिवाण शहा तलाव येथे फिरत हाेता. भोईवाडा पोलिसांना आराेपीची माहिती समजताच त्याला सापळा लावून अटक केली. त्याचा ताबा निजामपूर पोलिसांकडे सोपवला. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.  

नराधमाची हत्या करामाझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याचीही तशीच हत्या करा तेव्हाच माझ्या मुलीच्या आत्म्याला व आम्हाला शांती मिळेल, अशी मागणी करत पीडितेच्या आईने टाहो फोडला. मालकाने चाळीत राहायला आलेल्या भाडेकरूची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असतानाही पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे चाळ मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती भिवंडीचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.

पोलिसांचे अपयश चव्हाट्यावरआरोपी सलामत हा विकृत असून, त्याने १३ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील फेणेगाव येथे चाळीतील सहावर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार करून हत्या केली होती. मुलीचा मृतदेह गोणीत कोंबून तो पसार झाला होता. पोलिसांनी सलामतला बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावातून अटक केली. न्यायालयीन सुनावणीसाठी त्यास ४ ऑगस्ट रोजी ठाणे कारागृहातून भिवंडी न्यायालयात आणले असता पोलिसांची नजर चुकवून तो पसार झाला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Escaped Accused in Court Kills Another Girl After Assault

Web Summary : Escaped from Bhivandi court after a rape-murder charge, Salamat Ansari allegedly assaulted and murdered another 7-year-old girl. Police arrested Ansari, revealing a prior similar crime. Public outrage demands justice for the victims.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी