दाऊदच्या आणखी एका हस्तकाला कन्नूर विमानतळावरून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 17:39 IST2019-08-15T17:35:41+5:302019-08-15T17:39:50+5:30
या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

दाऊदच्या आणखी एका हस्तकाला कन्नूर विमानतळावरून अटक
ठळक मुद्देपोलिसांनी सईदविरोधात सर्व विमानतळावर लूक आऊट नोटीस जारी केली होती. सईदला मोक्का कोर्टात हजर केलं असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील दोन सदस्यांना बेड्या ठोकल्यानंतर टोळीतील इतर हस्तकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकांच्यापोलिसांनी गँगस्टर अनिस इब्राहिम याचा हस्तक मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईद याला सोमवारी केरळमधील विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.