संतापजनक! जन्मदात्या आईनेच केला स्वत:च्या मुलीचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 00:32 IST2020-09-03T00:32:22+5:302020-09-03T00:32:53+5:30

मीरा रोड येथील एक महिला स्वत:ची मुलगी व्हर्जिन असून, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Annoying! The mother made the deal for her own daughter | संतापजनक! जन्मदात्या आईनेच केला स्वत:च्या मुलीचा सौदा

संतापजनक! जन्मदात्या आईनेच केला स्वत:च्या मुलीचा सौदा

नवी मुंबई - पोटच्या मुलीसोबत शरीसंबंध करण्यासाठी बोली लावून सौदा करणाऱ्या आईला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ती मीरा रोड येथे राहणारी असून, तिच्या मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचे पितळ उघडे पाडले आहे.

मीरा रोड येथील एक महिला स्वत:ची मुलगी व्हर्जिन असून, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांना मिळाली होती. यानुसार, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गरड यांनी बनावट ग्राहक तयार केले होते. या ग्राहकामार्फत सदर महिलेला संपर्क साधला असता, तिने १८ वर्षीय मुलीसोबत संबंधासाठी दीड लाख रुपयांची बोली लावली. अखेर तडजोड करून १ लाख २० हजार रुपयांवर सौदा करण्यात आला.

त्यानुसार, सोमवारी ही महिला स्वत:च्या मुलीला घेऊन नवी मुंबईत आली होती. यावेळी शिरवणे येथील कोहिनूर पॅलेस हॉटेलमधील खोलीत ग्राहकासोबत सदर मुलीला पाठविले असता, गरड यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मुलीला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Annoying! The mother made the deal for her own daughter