शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी गरजेची नाही: सीबीआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 07:34 IST

अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयला देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आणि या चौकशीच्या आधारेच सीबीआयने त्यांच्यावर एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल केला, असे सीबीआयने गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेली याचिका रद्द करावी, अशी विनंती सीबीआयने उच्च न्यायालयाला केली. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी गरजेची नाही, अशी माहितीही उच्च न्यायालयाला दिली.

अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयला देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आणि या चौकशीच्या आधारेच सीबीआयने त्यांच्यावर एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल केला, असे सीबीआयने गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

कायद्याचा गैरवापर करण्यासाठी देशमुख यांनी ही याचिका दाखल केली, असे सीबीआयचे म्हणणे आहे. देशमुख यांना कोणताही दिलासा न देता त्यांची याचिका फेटाळावी, प्राथमिक चौकशी असली तरी सध्या हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.तर, माझ्यावर आरोप करण्यात आले, तेव्हा मी सरकारी कर्मचारी होतो. त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यापूर्वी सीबीआयने राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, सीबीआयने तसे केले नाही, असे देशमुख यांनी याचिकेत नमूद आहे.

सुनावणी १८ जून राेजी हाेण्याची शक्यताnसीबीआयने देशमुख यांचे म्हणणे खोडले. या प्रकरणी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशमुख यांच्या भ्रष्टाचार व गैरवर्तवणुकीबाबत पत्र लिहून कल्पना दिली होती. nया पत्रावरून दखलपात्र गुन्हा घडल्याचे स्पष्ट होते, असेही सीबीआयने स्पष्ट केले. देशमुख यांच्या याचकेवरील सुनावणी १८ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागHigh Courtउच्च न्यायालय