देशमुख यांनी लपविले 17 कोटींचे उत्पन्न, प्राप्तिकर विभागाच्या तपासातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:11 PM2021-09-21T12:11:01+5:302021-09-21T12:11:59+5:30

१७ सप्टेंबर रोजी नागपूर, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे ३० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सीबीआय आणि ईडीकडून देशमुख यांची चौकशी सुरु आहे.

Anil Deshmukh hid income Rs 17 crore, information from Income Tax Department investigation | देशमुख यांनी लपविले 17 कोटींचे उत्पन्न, प्राप्तिकर विभागाच्या तपासातील माहिती

देशमुख यांनी लपविले 17 कोटींचे उत्पन्न, प्राप्तिकर विभागाच्या तपासातील माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित संस्थांवर प्राप्तिकर विभागाने अलीकडेच टाकलेल्या धाडीतून १७ कोटी रुपयांचे उत्पन्न लपविल्याचे समोर आले असल्याचा दावा प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी केला आहे.राष्ट्रवादीच्या या नेत्यांशी संबंधित नागपूर स्थित ट्रस्टमध्ये कथित वित्तीय अनियमितताही आढळून आली आहे. ते तीन शैक्षणिक संस्थाही चालवितात. सीबीडीटीने दावा केला की, तपासात मिळालेल्या पुराव्यांवरुन स्पष्ट संकेत मिळाले आहेत की, १७ कोटींचे उत्पन्न लपविले आहे.

१७ सप्टेंबर रोजी नागपूर, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे ३० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सीबीआय आणि ईडीकडून देशमुख यांची चौकशी सुरु आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, या व्यावसायिक समूहाचे नागपूर आणि महाराष्ट्रात शिक्षण, कृषी क्षेत्रात व्यवसायाशी संबंधित उलाढाली आहेत. तपासात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत. हे पुरावे बेहिशेबी वित्तीय देवाणघेवाण दाखवितात. असे पुरावे अनेक आर्थिक वर्षांचे सापडले आहेत. ही रक्कम १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. ट्रस्टने पावत्या लपविण्यासह ८७ लाखांचे पेमेंट नगदी केले आहेत. हे पूर्णपणे बेहिशेबी आहे, असेही यात म्हटले आहे.

कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त 
तपासात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. हे पुरावे बेहिशेबी वित्तीय देवाणघेवाण दाखवितात. असे पुरावे अनेक आर्थिक वर्षांचे सापडले आहेत. ही रक्कम १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. ट्रस्टने पावत्या लपविण्यासह ८७ लाखांचे पेमेंट नगदी केले आहेत. हे पूर्णपणे बेहिशेबी आहे, असेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
 

Web Title: Anil Deshmukh hid income Rs 17 crore, information from Income Tax Department investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.