व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:32 IST2025-06-17T19:27:01+5:302025-06-17T19:32:15+5:30

फोन करणाऱ्या तरुणाने दूतावासाच्या इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आणि लगेच फोन कट केला.

Angry over visa rejection, young man threatens to blow up US embassy with bomb! Arrested by police | व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक

व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिसांनी २२ वर्षीय सिद्धार्थ भन्साळी या तरुणाला अटक केली आहे. सिद्धार्थवर अमेरिकन दूतावासाला बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सिद्धार्थ परळ येथील एका सोनाराचा मुलगा आहे.

व्हिसा नाकारल्याने दिली धमकी

बीकेसी पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या पालकांकडे अमेरिकेचा व्हिसा आहे, पण सिद्धार्थकडे नाही. त्याने व्हिसासाठी अर्ज केला होता, परंतु त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्याने तो संतप्त झाला. याच रागातून त्याने थेट अमेरिकन दूतावासाला धमकीचा फोन केला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही धमकी हिंदी भाषेत एका दूतावास अधिकाऱ्याला देण्यात आली होती. फोन करणाऱ्याने दूतावासाच्या इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आणि लगेच फोन कट केला.

पोलिसांनी शोध घेऊन केली अटक

पोलिसांनी तांत्रिक तपास करून सिद्धार्थचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. "तो मानसिकदृष्ट्या त्रासलेला दिसत होता आणि व्हिसा नाकारल्यामुळेच त्याने ही धमकी दिल्याचे त्याने कबूल केले," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सिद्धार्थला नोटीस बजावून नंतर सोडून देण्यात आले.

Web Title: Angry over visa rejection, young man threatens to blow up US embassy with bomb! Arrested by police