रिक्षाचालकाला भररस्त्यात तरुणीने लगावली श्रीमुखात; 'तो' जोडत राहिला हात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 21:34 IST2021-12-07T21:34:23+5:302021-12-07T21:34:49+5:30

Crime News : रस्त्याने जात असताना एका रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेमुळे तरुणीच्या राग अनावर झाला आणि रस्त्यातच गाडी उभी करून रिक्षाचालकाकडे धाव घेत त्याच्या कानशिलात लगावली.

Angry girl slapped auto driver in middle of road at bhopal viral video | रिक्षाचालकाला भररस्त्यात तरुणीने लगावली श्रीमुखात; 'तो' जोडत राहिला हात 

रिक्षाचालकाला भररस्त्यात तरुणीने लगावली श्रीमुखात; 'तो' जोडत राहिला हात 

रिक्षाची दुचाकीला धडक बसल्यामुळे संतापलेल्या तरुणीने रिक्षाचालकाच्या श्रीमुखात लगावल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्याने जात असताना एका रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेमुळे तरुणीच्या राग अनावर झाला आणि रस्त्यातच गाडी उभी करून रिक्षाचालकाकडे धाव घेत त्याच्या कानशिलात लगावली.

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये दुचाकीवरून चाललेल्या तरुणीला एका रिक्षाचा धक्का लागला. यावरून तरुणीला राग आला. रागाच्या भरात तिने रस्त्यातच आपली गाडी उभी केली आणि रिक्षाचालकाला मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ बघ्यांनी रेकॉर्डही केला. या व्हिडिओत जीन्स आणि कुर्ता घातलेली तरूणी रिक्षाच्या दिशेनं जाताना आणि रिक्षाचालकाच्या श्रीमुखात लगावताना दिसत आहे.

रिक्षाची गाडीला धडक बसल्यानंतर रिक्षाचालकाने आपली चूक कबूल करत तरूणीची माफी मागितली. मात्र, तरीही तरुणीच्या राग काही थांबत नव्हता. या घटनेमुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली. घटना घडली तेव्हा रेड सिग्नल लागला होता. काही वेळात सिग्नल ग्रीन झाला, मात्र भर रस्त्यात सुरू असलेल्या भांडणामुळे वाहनांना पुढं जाणं शक्य होईना. या घटनेमुळे शहरात अनेक तास ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण झाली होती. तरुणी आणि रिक्षाचालक दोघांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नसल्यामुळे पोलिसांनी याबाबत अद्याप कुठलाही पोलिसांनी कारवाई केलेली नाही.

Web Title: Angry girl slapped auto driver in middle of road at bhopal viral video