मित्राच्या पत्नीसोबत अफेअर, फेसबुकवर कमेंट केल्यामुळे त्याचेच टक्कल करुन व्हिडिओ व्हायरल केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 16:14 IST2023-03-05T16:13:58+5:302023-03-05T16:14:31+5:30
आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. वाचा नेमकं काय झालं...?

मित्राच्या पत्नीसोबत अफेअर, फेसबुकवर कमेंट केल्यामुळे त्याचेच टक्कल करुन व्हिडिओ व्हायरल केला
Love Affair Crime :आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही लोकांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण करुन नंतर मुंडन केले. पीडित व्यक्तीने फेसबुकवर कमेंट केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्यक्तीचे टक्कल करणारेही त्याचेच मित्र होते.
मित्राच्या पत्नीसोबत अफेअर
मीडिया रिपोर्टनुसार, वामसी असे या व्यक्तीचे नाव आहे. तो तिरुपती जिल्ह्यातच ऑटो चालवतो. त्याचे फेसबुकवरुन एका तरुणीशी सुख जुळले आणि त्यांचे लग्नही झाले. वामसी हा त्याचाच मित्र असलेल्या अनवरचा ऑटो भाड्याने चालवत होता. त्यामुळे अनवरचे वामसीच्या घरी येणे-जाणे होते. काही दिवसानंतर अनवरचे वामसीच्या पत्नीसोबत सुख जुळले आणि ती गरोदर झाली.
फेसबुक कमेंटमध्ये 'RIP' लिहिले
दीड महिन्यापूर्वी वामसीच्या पत्नीला गरोदर झाल्याचे कळले, पण अनवरने मुलाला घेण्यास नकार दिला. यानंतर वामसीला त्या दोघांबद्दल माहिती मिळाली. एके दिवशी वामसी फेसबुकवर स्क्रोल करत असताना त्याला अनवरच्या वॉलवर अनवर आणि त्याच्या पत्नीचा फोटो दिसला. त्याने त्या फोटोवर 'RIP' अशी कमेंट केली.
अपहरणानंतर मुंडण
अनवरला ही गोष्ट पचनी पडली नाही आणि त्याने मित्रांच्या मदतीने वामसीचे अपहरण करण्याचा कट रचला. वामसीचे अपहरण केल्यानंतर अनवरने त्याचे मुंडण केले आणि घटनेचा व्हिडिओही बनवला. यानंतर वामसीने ऑटो युनियनमध्ये या संपूर्ण घटनेची माहिती दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.