आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार अन् निर्घृण हत्या; 3 अल्पवयीन आरोपी ताब्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 03:29 PM2024-07-11T15:29:11+5:302024-07-11T15:29:39+5:30

Andhra Pradesh News : हत्येनंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह कालव्यात फेकून दिला.

Andhra Pradesh News : Gang rape and brutal murder of an eight-year-old girl; 3 minor accused in custody | आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार अन् निर्घृण हत्या; 3 अल्पवयीन आरोपी ताब्यात...

आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार अन् निर्घृण हत्या; 3 अल्पवयीन आरोपी ताब्यात...

Andhra Pradesh gang rape case :आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नंद्याल जिल्ह्यात येथील एका 8 वर्षीय मुलीवर तिच्याच शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. रविवारी(दि.7) घडलेल्लाया घटनेचा काल(दि.10) खुलासा झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12-13 वर्षीय आरोपी आणि पीडित मुलगी एकाच शाळेत शिकायचे. घटनेच्या दिवशी आरोपींनी तिला खेळणाच्या बहाण्याने एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर आपण पकडले जाऊ, या भीतीने तिघांनी त्या चिमुकलीच निर्घृण हत्या केली आणि मृतदेह कालव्यात फेकून दिला. मुलगी घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी रविवारी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि एका आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर दोघांची नावे सांगितली. 12 वर्षीय आरोपी सहाव्या वर्गात शिकतो, तर तिसरा 13 वर्षीय आरोपी 7 वीत आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, कालव्यात फेकलेला मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत. 

Web Title: Andhra Pradesh News : Gang rape and brutal murder of an eight-year-old girl; 3 minor accused in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.