अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:14 PM2021-10-22T16:14:29+5:302021-10-22T16:15:27+5:30

Ananya Pandey : आज देखील चौकशीसाठी अनन्या सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहचणार होती, पण दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती पोहोचली. आता तिची एनसीबी कार्यालयात चौकशी सुरु आहे. 

Ananya Pandey responds to NCB, says chat is not about drugs but about cigarettes | अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

Next
ठळक मुद्देवीड संदर्भात झालेल्या चॅटबद्दल अनन्याने एनसीबीला सांगितलं की, 'त्यावेळी सिगारेट आणण्यावरून हे चॅट झाले होते.

अभिनेत्री अनन्या पांडेची NCB सलग दुसऱ्या दिवशी आर्यन खानच्या मुंबई क्रूज ड्रग पार्टी प्रकरणात चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर म्हणजेच काल देखील २ तास केलेल्या चौकशीत एनसीबीला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, ज्यात ड्रग्ज प्रकरणाचा सर्वात मोठा दुवा म्हणजे आर्यनच्या अनन्याशी झालेल्या चॅटवर अनन्याने आपला जबाब नोंदवला आहे. काल अनन्या वडिलांसोबत एनसीबी कार्यालयात आली होती. त्यावेळी वडील चंकी पांडे यांना बाहेर बसवण्यात आला आणि अनन्या पांडेची चौकशी विश्व विजय सिंग,समीर वानखेडे आणि एक महिला अधिकारी या तिघांनी केली. त्यावेळी वीड संदर्भात झालेल्या चॅटबद्दल अनन्याने एनसीबीला सांगितलं की, 'त्यावेळी सिगारेट आणण्यावरून हे चॅट झाले होते.

तसेच अनन्या पांडेने एनसीबीला पुढे सांगितले की, 'मी आर्यन खानसोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. तसेच आर्यनची बहीण सुहाना खानची सुद्धा जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे आर्यन खान आणि सुहाना आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. शूटिंगमधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही सगळे एकत्र भेटतो, त्यामध्ये आमच्या शाळेतील मित्र सुद्धा असतात.' वीडबाबत अनन्या पांडेला विचारण्यात आलं तेव्हा आपण कुठल्याही प्रकारची ड्रग्स घेत नाही तसेच कधी सप्लायही केलं नसल्याचं एनसीबीला तिने सांगितले.

वीड संदर्भात झालेल्या चॅटबाबत अनन्याने त्यावेळी सिगारेट आणण्यावरून हे चॅट झाले होते. मात्र खूप वर्षांपूर्वीचे चॅट असल्यामुळे नीट आठवत नाही. तरीदेखील वीड हे एका प्रकारचे ड्रग्स आहे, हे मला माहिती नाही असं एनसीबीला सांगितलं. आज देखील चौकशीसाठी अनन्या सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहचणार होती, पण दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती पोहोचली. आता तिची एनसीबी कार्यालयात चौकशी सुरु आहे. 

 

Web Title: Ananya Pandey responds to NCB, says chat is not about drugs but about cigarettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app