महिलेने आर्किटेक्चरला पावणेदोन कोटींचा घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:16 IST2023-09-27T13:15:05+5:302023-09-27T13:16:22+5:30
आर्किटेक्चरच्या व्यवसाय करणाऱ्या ६० वर्षीय तक्रारदार ताडदेव परिसरात राहतात.

महिलेने आर्किटेक्चरला पावणेदोन कोटींचा घातला गंडा
मुंबई : मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत स्वीय सहायक महिलेने स्वतःच्या खात्यात वळते केल्याचा प्रकार दादरमध्ये समोर आला आहे. तीन वर्षात महिलेने पावणेदोन कोटी स्वतःच्या खात्यात वळते केले आहेत.
आर्किटेक्चरच्या व्यवसाय करणाऱ्या ६० वर्षीय तक्रारदार ताडदेव परिसरात राहतात. कंपनीचे व्यवहार हाताळण्यासाठी ऋतुजा परब (४५) हिला कामावर ठेवले.काही वर्षात परब विरुद्धच्या तक्रारी वाढल्या. २०२१ मध्ये १७ , २०२२ मध्ये ३७ तर २०२३ मध्ये ९६ लाख ट्रान्सफर केले होते.