शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीने न ऐकल्यानं संतापला; घरी जाऊन तिच्या डोक्यात गोळ्या झाडल्या अन् शेतात लपला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:09 IST

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

प्रेयसीने न ऐकल्यामुळे प्रियकराने घरात जाऊन तिची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई गावात घडली आहे. सदर घटनेनंतर आरोपीने टेरेसवरुन उडी मारून शेताकडे धाव घेतली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

महिला तुरुंग अधिकारी कैद्याच्या प्रेमात; किसच्या बदल्यात..., अधिकारीही पडले बुचकळ्यात!

सदर घटनेनंतर स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि तपास केला. त्यानंतर आरोपीला पकडण्यात देखील पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी शेतात नाकाबंदी करून आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, प्रेयसीने माझे ऐकले नाही, या गोष्टीचा तो नाराज होता, त्याने रागाने तिची हत्या केली. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे एसपींनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सर्व मुद्दे तपासून पुढील कार्यवाही केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!

मृत दीपमाला या गावातील पंचायत सहायक होत्या. मिळालेल्या माहितीनूसार, तिचे शेजारी उमेश कुशवाहासोबत अफेअर होते. दोघेही एकाच जातीचे होते. उमेश पानिपत येथे मजुरीचे काम करतो.  शुक्रवारी दुपारी दीपमाला आपली वहिनी केतकीसोबत टेरेसवर बसली होती. घरातील इतर सदस्य बाहेर होते. त्याचवेळी उमेशने घरात घुसून टेरेसवर जाऊन दीपमालाच्या डोक्यात पिस्तुलाने गोळ्या झाडून खून केला. घटनेनंतर आरोपीने छतावरून उडी मारून शेताकडे धाव घेतली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू