माजी सैनिकाने केला गोळीबार, तंटामुक्त समितीचा अध्यक्षच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 22:36 IST2023-04-18T22:35:40+5:302023-04-18T22:36:09+5:30
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गोळीबार!

माजी सैनिकाने केला गोळीबार, तंटामुक्त समितीचा अध्यक्षच ठार
अकोला - जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येत असलेल्या लोतखेड गावात आपसी वादातुन गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात तंटामुक्त समितीचा अध्यक्ष फिरोज पठाण जागीच ठार झाला असून गोळीबार करणारा माजी सैनिक असल्याची माहिती आहे.
जमिनीच्या वादातुन घडलेल्या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहिहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अंमलदारांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.