स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच एका महिलेला मिळणार फाशी, प्रेमासाठी घरातील ७ लोकांची केली होती हत्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 12:06 PM2021-02-17T12:06:16+5:302021-02-17T12:14:45+5:30

Amroha murder case : दोषी शबनमने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवला. यानंतर शबनम-सलीमने राष्ट्रपतींकडे केलेला माफीचा अर्जही फेटाळण्यात आला आहे.

Amroha murder case : Shabnam first woman to be hanged in independent India | स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच एका महिलेला मिळणार फाशी, प्रेमासाठी घरातील ७ लोकांची केली होती हत्या..

स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच एका महिलेला मिळणार फाशी, प्रेमासाठी घरातील ७ लोकांची केली होती हत्या..

googlenewsNext

Amroha murder case : मथुरा तुरूंगात महिलेला फाशी देण्याची तयारी तुरूंग प्रशासनाने सुरू केली आहे. ही फाशी अमरोहाची राहणारी महिला शबनमला दिली जात आहे. या महिलेने एप्रिल २००८ मध्ये प्रियकर सलीमसोबत मिळून आपल्या घरातील ७ लोकांची कुऱ्हाडीने कापून हत्या(Murder) केली होती. मथुरा तुरूंग प्रशासनाने फाशीच्या दोराची ऑर्डर दिली आहे. निर्भया कांडातील दोषींना फासावर लटकवणारा जल्लाद पवन याने फाशी घराची पाहणीही केली आहे. मात्र, फाशीची तारीख अजून ठरली नाही. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदाच एका महिलेला फाशी (Women Hangging) दिली जाणार आहे. 

दोषी शबनमने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवला. यानंतर शबनम-सलीमने राष्ट्रपतींकडे केलेला माफीचा अर्जही फेटाळण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर शबनम पहिली महिला कैदी असेल जिला फाशी दिली जाईल. देशात केवळ मथुरेच्या तुरूंगातील फाशी घरातच महिलेला फाशी दिली जाऊ शकते. सद्या शबनम बरेलीच्या तर सलीम आग्र्यातील तुरूंगात बंद आहे.

मथुरेच्या तुरूंगात १५० वर्षांआधी महिला फाशी घर तयार केलं होतं. स्वातंत्र्यानंतर इथे एकाही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. वरिष्ठ तुरूंग अधिक्षकानुसार, अजून फाशीची तारीख ठरलेली नाही. पण आम्ही तयारी सुरू केली आहे. दोरासाठी ऑर्डर दिली गेली आहे. डेथ वॉरंट जारी होताच शबनम-सलीमला फाशी दिली जाईल. सलीमला फाशी कुठे दिली जाईल हे ठरलेलं नाही.

काय आहे प्रकरण?

अमरोहाच्या हसनपूरमधील बावनखेडी गावात २००८ च्या १४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली होती. इथे शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत मिळून आपले वडील, शिक्षक शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिणी अंजुम आणि चुलत बहीण राबिया यांची कुऱ्हाडीने कापून हत्या केली होती. भाचा अर्शचा गळा आवळला होता. हे लोक तिच्या प्रेमात आडकाठी ठरत होते.

२०१० मध्ये सुनावली होती फाशीची शिक्षा

या केसची अमरोहा कोर्टात दोन वर्ष तीन महिने सुनावणी सुरू होती. ज्यानंतर १५ जुलै २०१० ला न्यायाधीश एसएए हुसैनी यांनी शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय दिली होता.

कसे मिळाले पुरावे

शबनम आणि तिचा प्रियकर सापडेलच नसते, पण काही शुल्लक पुराव्यामुळे ते सापडले. शबनमने लग्न केलं नव्हतं. पण तिला मुलगा होता. हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड सलीमकडे सापडली होती. दोघांचे रक्ताने भिजलेले कपडे सापडले होते. तीन सिमकार्डही त्यांच्याकडे सापडले होते. ज्यावर दोघांनी अनेकदा या हत्याकांडावर चर्चा केली होती.

घटनेनंतर पकडले गेल्यावर शबनम आणि सलीम यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. सर्व्हिलांसमुळे दोघांतील बोलण्याची माहिती मिळाली. नंतर शबनमकडे औषधाचं रिकामं रॅपर मिळालं होतं आणि फॉरेन्सिक रिपोर्टही आला होता. शबनमच्या वहिणीच्या वडिलांनी कोर्टात सलीम आणि शबनमचे अनैतिक संबंध उघड केले होते. सलीन घटनेनंतर हसनपूर ब्लॉक प्रमुख महेंद्रकडे गेला होता. त्याने त्यांना सगळं सांगितलं होतं.
 

Web Title: Amroha murder case : Shabnam first woman to be hanged in independent India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.