Crime News: रिलायन्स हॉस्पिटल उडवण्यासह अंबानी कुटुंबीयांना धमकी, फोनकॉलमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:52 IST2022-10-05T16:52:09+5:302022-10-05T16:52:57+5:30
Crime News: रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता.

Crime News: रिलायन्स हॉस्पिटल उडवण्यासह अंबानी कुटुंबीयांना धमकी, फोनकॉलमुळे खळबळ
मुंबई - रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. त्यामध्ये रिलायन्स रुग्णालय उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबीयांनाही धमकी देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२.५७ वाजण्याच्या सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिलेली होती.
या धमकीच्या फोननंतर डॉ. डी.बी.मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून याप्रकरणी अधिक चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.