'पत्नी म्हणते दाढी कापा नाही तर घटस्फोट देईन', इमाम मदतीसाठी पोलिसांकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 03:13 PM2021-11-25T15:13:09+5:302021-11-25T15:13:44+5:30

दाढीवरून होत असलेल्या वादादरम्यान इमामने एसएसपीकडे तक्रार केली आहे. सध्या या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवून घेतलेली नाही.

UP : Aligarh wife said to break marriage with the men for keeping the beard | 'पत्नी म्हणते दाढी कापा नाही तर घटस्फोट देईन', इमाम मदतीसाठी पोलिसांकडे

'पत्नी म्हणते दाढी कापा नाही तर घटस्फोट देईन', इमाम मदतीसाठी पोलिसांकडे

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका इमामाच्या पत्नीने पतीने दाढी काढली नाही तर लग्न तोडण्याची धमकी दिली आहे. महिलेचं म्हणणं हे की, मी एक मॉडर्न तरूणी आहे, त्यामुळे मला विना दाढीवाला पती हवा आहे. दाढीवरून होत असलेल्या वादादरम्यान इमामने एसएसपीकडे तक्रार केली आहे. सध्या या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवून घेतलेली नाही.

तक्रार करण्यासाठी पोहोचलेल्या इमामाने सांगितलं की माझं लग्न जून २०२० मध्ये झालं होतं.  माझी घरवाली मला म्हणते की, तू दाढी काढून टाक. कारण मी एक मॉडर्न मुलगी आहे. मी एका धार्मिक स्थळात इमाम आहे. मी असं करू शकत नाही. त्यामुळे मी तक्रार घेऊन आलो आहे. कारण मी माझ्या पत्नीला फार जास्त वैतागलो आहे.

तक्रारदार म्हणाला की,  लग्न झाल्यावर काही दिवसातच पत्नी दाढी काढण्यावरून धमकी देत होती. एक दिवस ती असं म्हणाली की, मी एक मॉडल मुलगी आहे. अशी नाही राहू शकत. त्यामुळे दाढी काढून टाक.  दाढी काढण्यावरून लग्न झाल्यापासूनच आमच्यात वाद होत आहे. माझ्या-आई वडिलांसोबत वाद होत आहे.

इमाम आपल्या पत्नीची तक्रार एसएसपी ऑफिसला येऊन केली. त्याने त्याचं दु:खं लोकांना सांगितलं. पण त्याचं बोलणं एसएसपी साहेबांसोबत होऊ शकलं नाही.  पण आता इमामचं मत आहे की, त्याला न्याय हवा आहे.
 

Web Title: UP : Aligarh wife said to break marriage with the men for keeping the beard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.