‘अली हा तुनीषाचा मित्र, जिम ट्रेनर’; शिजानच्या जामिनावर उद्या सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 06:32 IST2023-01-12T06:31:59+5:302023-01-12T06:32:13+5:30

आत्महत्येपूर्वी १५ मिनिटे ती अलीशी व्हिडीओ कॉलवर बोलली होती, असाही दावा त्यांनी केला. मात्र, तुनीषाच्या आईने या वृत्ताचे खंडन केले.

'Ali is Tunisha's friend and gym trainer'; Shijan khan bail hearing tomorrow | ‘अली हा तुनीषाचा मित्र, जिम ट्रेनर’; शिजानच्या जामिनावर उद्या सुनावणी

‘अली हा तुनीषाचा मित्र, जिम ट्रेनर’; शिजानच्या जामिनावर उद्या सुनावणी

नालासोपारा : दोन दिवसांपूर्वी शिजान खानच्या वकिलांनी न्यायालयात दावा केलेला अली हा तुनीषाचा जिम ट्रेनर असल्याचा व ते दोघे चांगले मित्र असल्याचा दावा तिची आई वनिता यांनी केला आहे. दरम्यान, तुनीषाच्या आत्महत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने दोन दिवस पुढे ढकलली असून, ती आता १३ जानेवारीला होईल. १२ दिवसांपासून शिजान खान हा ठाण्याच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे. तो तुनीषाचा सहकलाकार आणि एकेकाळचा प्रियकर आहे. त्याला वसई न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणात ९ जानेवारीला शिजान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी वसई न्यायालयात दावा केला होता की, शिजानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनीषा अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती. तिची भेट टिंडर या डेटिंग ॲपवर झाली होती. आत्महत्येपूर्वी १५ मिनिटे ती अलीशी व्हिडीओ कॉलवर बोलली होती, असाही दावा त्यांनी केला. मात्र, तुनीषाच्या आईने या वृत्ताचे खंडन केले.

वनिता म्हणाल्या, तुनीषाने मला फोन करून सांगितले होते की, ती जिम ट्रेनर अलीला भेटते. तीन महिन्यांपूर्वी तो तिचा जिम ट्रेनर होता. मृत्यूच्या तीन दिवस आधी ती त्याच्यासोबत जेवायला गेली होती आणि गप्पाही मारत होती. ते फक्त मित्र होते आणि डिसेंबरमध्ये तीनवेळा भेटले. तुनीषाने मला अलीसोबत एक मित्र म्हणून भेटत असल्याबद्दल सांगितले होते. दि. २१, २२ आणि २३ डिसेंबरला माझी मुलगी घरी परतली नसल्याचा दावा शिजानच्या वकिलाने केला; पण हे खरे नसल्याचे तिच्या आईने सांगितले.

Web Title: 'Ali is Tunisha's friend and gym trainer'; Shijan khan bail hearing tomorrow