Alcohol seized by the State Excise Department | राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू जप्त

पिंपरी :  राज्य उत्पादन शुल्कच्या ई विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात गोवा बनावटीची दारू विकण्यासाठी आलेल्या टेम्पोमधून तब्बल ११ लाख ९४ हजार ६०० रुपयांचे दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज, मंगळवारी (दि. १२) कोकणे चौक, रहाटणी येथे करण्यात आली. नागेश मारुती सावंत (वय २९, रा. भूमकर चौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाकड ते नाशिक फाटा या मार्गावरून एक टेम्पो गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेऊन जाणार असल्याची माहिती पिंपरी विभागाला मिळाली. त्यानुसार, रहाटणी येथील कोकणे चौकात मंगळवारी पहाटे सापळा रचून एका संशयित टेम्पोला थांबवून चौकशी केली असता टेम्पोमध्ये विदेशी मद्याचे ११ लाख ९४ हजार ६०० रुपये किमतीचे १३९ बॉक्स आढळून आले. 
  गोवा राज्यातून स्वस्त दरात खरेदी करून महाराष्ट्रात जास्त किमतीला विकून पैसे कमावण्यासाठी ही दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या मद्यामुळे शासनाचा महसूल चुकवला जातो. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही दारू आणल्याचे समोर आले आहे.

Web Title: Alcohol seized by the State Excise Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.