अकोला हादरले! शीतपेयातून दारू पाजून दोघींवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 08:48 IST2022-12-18T08:48:27+5:302022-12-18T08:48:39+5:30

१६ डिसेंबर रोजी १६ व १४ वर्षीय दोन मुली मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेल्या होत्या. तेथून परत येत असताना,  एका मुलीला तिच्या ओळखीचा ऋषिकेश नामक युवक भेटला.

Akola shook! Gang rape on two girls by drinking alcohol from soft drinks | अकोला हादरले! शीतपेयातून दारू पाजून दोघींवर सामूहिक बलात्कार

अकोला हादरले! शीतपेयातून दारू पाजून दोघींवर सामूहिक बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दोन अल्पवयीन मुलींवर तीन ते चार युवकांनी कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने अकोला शहर हादरून गेले आहे. सिव्हिल लाईन पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे.

१६ डिसेंबर रोजी १६ व १४ वर्षीय दोन मुली मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेल्या होत्या. तेथून परत येत असताना,  एका मुलीला तिच्या ओळखीचा ऋषिकेश नामक युवक भेटला. त्याने घरी सोडतो असे सांगितल्यावर दोघी त्याच्या दुचाकीवर बसल्या. परंतु त्याने घरी न जाता त्यांना एका अपार्टमेंटच्या टेरेसवर नेले. याठिकाणी काही चॉकलेट, कोल्ड्रिंक्स प्यायला दिले. मुलींना गुंगी आल्यावर आरोपी युवकाने जबरी संभोग केला. यावेळी त्याच्या एका मित्रासह दोघे टेरेसवर पोहोचले. त्यांनीही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आहे. हा प्रसंग लक्षात आल्यावर मुलींनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर शनिवारी सकाळी पालकांसह मुलींनी पोलिसात तक्रार नोंदविली. 

तीन युवकांना  घेतले ताब्यात
बालकल्याण समितीसह पोलिसांनी मुलींची तक्रार ऐकून घेतली. मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी सकाळी ऋषिकेश, रोहित व करण नामक तीन युवकांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Akola shook! Gang rape on two girls by drinking alcohol from soft drinks