लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा स्पष्ट बहुमत मिळविले आहे. दरम्यान, राजधानी लखनौमधील चिन्हाट येथे राहणाऱ्या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने लोहिया रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यादव उर्फ नरेंद्र (वय 40, रा. चिन्हाटच्या कामटा येथे राहणारा) कुटुंबासह राहतो. विभूतीखंडमधील अवध बसस्थानकाशेजारी असलेल्या पारिजात अपार्टमेंटसमोर तो चहाची टपरी लावतो.नरेंद्रने बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये त्याने 2022 मध्ये सपाचे सरकार न आल्यास विष प्राशन करून आत्महत्या करू, असे म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पारिजात अपार्टमेंटजवळ विषारी द्रव्य प्राशन केले. रस्त्यात त्याला होणारा त्रास पाहून आजूबाजूच्या लोकांनी या प्रकरणाची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र अनेक दिवसांपासून चहाची टपरी चालवत नव्हता.
समाजवादी पक्षाचा पराभव जिव्हारी लागला; अखिलेश यादवांच्या कार्यकर्त्याचं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:41 IST