अजिंठा येथील खूनप्रकरण; चौकशीसाठी पोलीस अमळनेरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 18:19 IST2020-11-23T18:15:54+5:302020-11-23T18:19:36+5:30
पोलिसांनी अमळनेर येथील चुन्याच्या कंपनीत आणि नगर येथील टेलरकडे चौकशी केली.

अजिंठा येथील खूनप्रकरण; चौकशीसाठी पोलीस अमळनेरात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : अजिंठा येथील शेती शिवारात अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणात अजिंठा पोलीस अमळनेरात चौकशीसाठी येऊन गेले एक ४२ वर्षे वयाच्या व्यक्तीचा डोक्यात धारदार शस्राने वार करून खून करण्यात आला होता. त्याच्या खिशात अशोक चुन्याची पुडी सापडली होती आणि त्याचे कपडे नगर येथील एका टेलरकडे शिवण्यात आले होते. म्हणून पोलिसांनी अमळनेर येथील चुन्याच्या कंपनीत आणि नगर येथील टेलरकडे चौकशी केली. चौकशीसाठी पोलीस उपनिरीक्षक आर. डी. राठोड आपल्या पथकासह अमळनेरला येऊन गेले.
दरम्यान मयताच्या अंगात भुरकट रंगाची पॅन्ट आणि निळे, पांढरे, पिवळे पट्टे असलेला शर्ट घातला असून त्याची ओळख पाठवण्याचे आवाहन अजिंठा पोलिसांनी केले आहे.