AIIMS Doctor Rape Case: एम्स हादरले! वाढदिवसाच्या पार्टीला महिला डॉक्टरला बोलावले; वरिष्ठ डॉक्टर बलात्कारानंतर फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 16:08 IST2021-10-15T16:07:50+5:302021-10-15T16:08:33+5:30
Rape on Delhi's AIIMS Doctor: एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची हौजखास पोलीस हॉस्पिटमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

AIIMS Doctor Rape Case: एम्स हादरले! वाढदिवसाच्या पार्टीला महिला डॉक्टरला बोलावले; वरिष्ठ डॉक्टर बलात्कारानंतर फरार
देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असलेल्या एम्समध्ये (AIIMS) खळबळ उडाली आहे. एम्सच्या एका महिला डॉक्टरने तिच्या वरिष्ठ डॉक्टरवर बलात्काराचा (Rape on female Doctor) आरोप केला आहे. पोलिसांनी पीडित महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार झाला आहे.
महिला डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, एम्समधील आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस होता, त्याने पार्टीला बोलावले म्हणून वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिथे आलेल्या वरिष्ठ डॉक्टरने बलात्कार केला. पोलिसांनुसार ही घटना 10 ऑक्टोबरच्या रात्रीची आहे. बर्थडे पार्टीमध्ये अन्य लोकही आले होते. आरोपीने त्यांच्या नकळत संधी साधली आणि बलात्कार केला. पोलिसांनी मॅजिस्ट्रेटसमोर पीडित महिलेचा जबाब नोंदविला आहे.
बलात्कार केल्यानंतर हा डॉक्टर पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे मारत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. महिलेच्या तक्रारीनंतर लगेचच पोलिसांनी कारवाई केली. डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची हौजखास पोलीस हॉस्पिटमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तेथून बलात्काराची पुष्टी होताच पुढील कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी टेक्निकल सर्विलान्सची मदत घेतली जात आहे. आरोपी डॉक्टरला लवकरात लवकर पकडण्यात येईल.