शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

आमदार रवींद्र फाटक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 8:12 PM

64 हजारांसह गाडी केली पोलिसांनी जप्त

ठळक मुद्देबविआच्या महापौरासह 6 नगरसेवकांवर गुन्हा दाखल तर शिवसेनेच्या आमदार, उपजिल्हाप्रमुखासह 6 पदाधिकाऱ्यांवर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलतुळींज पोलीस ठाण्यात रविंद्र फाटक यांच्याविरोधात जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून आचारसंहिता भंग केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. 

मंगेश कराळे

नालासोपारा - लोकसभा निवडणुकीला अगदी थोडे तास शिल्लक असताना रविवारी रात्री नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क येथे बविआ आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे अंदाजे 1500 कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने रात्रभर राडा सुरू होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला पण रवींद्र फाटक यांच्या गाडीतून 64 हजार रुपये रोख मिळाल्याने ते गाडीसह जप्त करून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला असून बविआच्या महापौरासह 6 नगरसेवकांवर आणि शिवसेनेच्या आमदार, उपजिल्हाप्रमुखासह 6 पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कलमान्वये तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयात आमदार रवींद्र फाटक हे रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बसले असताना त्यांचा स्वीय सहायक आणि अंगरक्षक रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत बसले अस्तनाआ बविआचे महापौर रुपेश जाधव हे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथून जात असताना कार्यालय चालू असून काहीतरी काळेबेरे होत असल्याचा संशय असल्याने त्याठिकाणी थांबले. निवडणूकीच्या आधी मतदारांना खुश करण्यासाठी शिवसेना पैसे वाटल्याचा आरोप केल्यावर ती बातमी वसई तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणि बविआचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवक सदर ठिकाणी पोहचून हंगामा सुरू केल्यावर वसई तालुक्यातील शेकडो शिवसैनिकही पोहोचले. पोलिसांना ही माहिती मिळताच मोठा फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचून शांततेचे आवाहान करत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली नाही तर खूप मोठी हाणामारी झाली असती असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. बविआच्या आरोपावरून आमदार रवींद्र फाटक यांची गाडी तपासली असता त्यात 64 हजार रुपये रोख रक्कम भेटली. भरारी पथकाने गाडी व पैसे जप्त करून तुळींज पोलीस ठाण्यात रविंद्र फाटक यांच्याविरोधात जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून आचारसंहिता भंग केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. 

तुळींज पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप ऐकल्यानंतर दोघांविरुध्द वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. बविआचे महापौर रुपेश जाधव यांनी शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, त्यांचा स्वीय सहायक अजिंक्य गावकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, जितेंद्र शिंदे, हेमंत पवार, उत्तम तावडे आणि 25 ते 30 इतर कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर जमावबंदी, जाण्यास प्रतिबंध, गर्दी असे वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे तर फाटक यांचे स्वीय सहायक यांनी बविआचे महापौर रुपेश जाधव, उपमहापौर उमेश नाईक, निलेश देशमुख, अतुल साळुंखे, भरत मकवाना, प्रशांत राऊत, भूपेंद्र पाटील आणि 50 ते 60 इतर कार्यकर्त्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर जमावबंदी, जाण्यास प्रतिबंध, गर्दी असे वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी बविआचे उमेदवार बळीराम जाधव हेही पोलीस ठाण्यात उपस्थित होते तर पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंगही घटनास्थळी पोहचले होते.

दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की....

शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, स्वीय सहायक अजिंक्य गावकर आणि अंगरक्षक यांना गाडीतून जाण्यास मज्जाव करून प्रतिबंध करत धक्काबुक्की आणि शिविगाळ बविआच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली तर बविआचे महापौर रुपेश जाधव यांनाही शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. 

रात्रीच्या झालेल्या राड्यावरून दोन्ही पक्षाच्या लोकांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे तर आमदार रविंद फाटक यांच्या गाडीतून मिळालेली रोख रक्कम 64 हजार रुपये आणि गाडी जप्त केली आहे तर गाडी बॉण्डवर सोडून दिली आहे तर रक्कम जप्त करत त्यांच्यावर आचारसंहिताचा गुन्हा दाखल केला आहे. - डॅनियल बेन (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)

वसई विरार मधील ठाकुरांची गुंडागिरी रविवारच्या रात्री वसई विरारच्या जनतेने पाहिली. उद्भव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील गुंडगिरी संपवण्यासाठी दिलेल्या आवाजाला जनतेचा चांगला प्रतिसाद भेटत आहे हे पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच त्यांच्याकडून जमाव जमा करून हे दहशत निर्माण करण्याचे कृत्य केले आहे. गाडी फोडण्याची गुंडगिरीची भाषा महापौर करीत आहेत त्यामुळे महापौरासकट त्यांच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली असून ठाकुरांच्या या गुंडगिरीला यापुढे शिवसैनिक जश्यास तसे उत्तर देतील. - रविंद्र फाटक (आमदार, शिवसेना)

10 करोड वाटायला नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह आले होते पण ते पळाले आणि स्वतः सापडले. बाहेरच्यांनी राहायचे कशाला ? कायदा काही माहीत नाही का ? हरणार हे नक्की झाले असून काही तरी नाटके कुठे तरी व्याप करून भानगडी करायच्या जेणेकरून वोटिंग कमी होईल या उद्देशाने हे सगळे चालले आहे. - हितेंद्र ठाकूर (आमदार, बहुजन विकास आघाडी)

टॅग्स :ElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारीVirarविरारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी