शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अभिनेता अरमान कोहलीविरोधात गुन्हा; महिला सहकलाकाराशी केली गैरवर्तणूक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 20:37 IST

यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने कोहली अडचणीत आला होता. असं असताना पुन्हा एकदा अरमान कोहलीने महिला सहकलाकाराशी गौरवर्तणूक केल्यापरकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अरमान कोहलीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. 

ठळक मुद्दे मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने कोहली अडचणीत आला होता. महिला सहकलाकाराशी गौरवर्तणूक केल्यापरकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अरमानने पुन्हा महिलेला फोन करून तिच्याशी गैरवर्तवणूक करत अश्लील भाषा वापरली

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉसमधील स्पर्धक अरमान कोहलीविरोधात मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने कोहली अडचणीत आला होता. असं असताना पुन्हा एकदा अरमान कोहलीने महिला सहकलाकाराशी गौरवर्तणूक केल्यापरकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अरमान कोहलीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. 

महिला सहकलाकाराशी गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी अरमान आणि त्याचा मित्र दिलीप राजपूत यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुहू परिसरात राहणारी तक्रारदार महिला सिनेसृष्टीत छोट्या मोठ्या भूमिका करते. त्यामुळे तिची पूर्वीपासून अरमानसोबत ओळख होती. ५ महिन्यांपूर्वी एका पार्टीदरम्यान अरमानने तक्रारदार महिलेची ओळख सहआरोपी दिलीप याच्याशी करून दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये घनिष्ठ मैत्रीचे संबंध तयार झाले. कालांतराने दोघांनी एका प्रोजेक्टमध्ये ५० लाखांची गुंतवणूक केली. मात्र, हा प्रोजेक्ट समाधानकारक न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरून २ डिसेंबर रोजी दिलीपने महिलेला फोन करून अश्लील शिवीगाळ केली. तर याबाबत अरमानला ही त्याने कल्पना दिली. त्यानंतर अरमानने पुन्हा महिलेला फोन करून तिच्याशी गैरवर्तवणूक करत अश्लील भाषा वापरली  आणि धमकावले आहे. याप्रकरणी महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीही अरमानला त्याच्या मैत्रिणीली मारहाण केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली होती. या सर्व पकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArmaan Kohliअरमान कोहलीbollywoodबॉलिवूडArrestअटक